शेअर बाजार विश्लेषण: बाजारात 'कोहराम' थेट १००० अंशाने सेन्सेक्स व निफ्टी ३४५ अंशाने घसरला गुंतवणूकदारांचे सहा लाख कोटी पाण्यात

निवडणूकपूर्व काळातील सस्पेन्स कायम, केवळ ऑटो समभागात फायदा बाकी सगळ्या समभागात घसरण

    09-May-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात प्रचंड मोठी घसरण झाली आहे. आज तब्बल एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांकात १०६२.२२ अंशाने घसरण होत बाजार ७२४०४.१५ पातळीवर तर निफ्टी ५० निर्देशांकात ३४५.०० अंशाने घटत २१९५७.५० पातळीवर पोहोचला आहे. आज अनुक्रमे बीएसईत १.४४ व एनएसईत १.५५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. गेल्या काही दिवसातील सर्वात मोठी पडझड असून तीन दिवसातील पडझडीचे सत्र कायम राहिले आहे.
 
बीएसई (BSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे २.०१ व २.४१ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एनएसई (NSE)तील क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये ऑटो (०.७८%) वगळता सगळ्या प्रकारच्या घसरण झाली आहे. यामधील आज 'लाल ' रंग कायम राहिलेला. सर्वाधिक नुकसान तेल गॅस (३.१५%) एफएमसीजी (२.४७%) रियल्टी (२.२३%) मेटल (२.८७%) समभागात झाली आहे.
 
आज बीएसईत एकूण ३९४३ समभागाचे ट्रेडिंग झाले असून यातील ९२४ समभागात वाढ झाली तर २९१० समभागात घसरण झाली आहे. त्यातील १६० समभाग ५२ आठवड्यातील सर्वाधिक पातळीवर पोहोचले असून ४५ समभागात ५२ आठवड्यातील सर्वाधिक मूल्यांकन घसरले आहे. २१७ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ३६६ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
एनएसईत आज २६९४ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील ४८० समभागात वाढ झाली असून २०९८ समभागात घसरण झाली आहे. ७३ समभागाचे मूल्यांकन ५२ आठवड्यातील सर्वाधिक कमी राहिले आहे तर २९ समभागाचे मूल्यांकन ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरले आहे. यामध्ये ६८ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १२६ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
आज बाजारात पडझड झाल्याने दोन्ही बाजारातील गुंतवणूकीत यांचा परिणाम दिसला आहे. बाजारातील घसरणीमुळे आज गुंतवणूकदारांनी ६ लाख कोटी गमावले आहेत. बीएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल ३९३.४३ कोटींवर पोहोचले आहे तर एनएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ३९०. ०७ लाख कोटीवर पोहोचले आहे.
 
डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या किंमतीत कोणताही मोठा बदल झालेला नाही.अखेरीस रुपया २ पैशाने वधारून प्रति डॉलरच्या तुलनेत ८३.५० रुपयांवर पोहोचला आहे. भारताच्या देशांतर्गत मागणीत घट झाल्याने व आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर वधारल्याने आज बाजारात रुपयांची किंमत फार वाढू शकली नाही.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील घटलेल्या मागणीमुळे सोन्याच्या युएस फ्युचर गोल्ड निर्देशांकात घसरण झाली आहे. भारतातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange) मध्ये सोन्याच्या निर्देशांकात ०.०८ टक्क्यांनी घट झाल्याने सोने एमसीएक्सवर ७१०७१.०० पातळीवर पोहोचले आहे तर चांदीच्या निर्देशांकात ०.६१ टक्क्यांनी वाढ होत चांदी ८३५०३.०० स्तरावर पोहोचली आहे. 'गुड रिटर्न्स' या संकेतस्थळावरील माहितीनुसार १० ग्रॅम सोन्याच्या दरात सरासरी १०० ते ११० रुपयांनी घट झाली.मुंबईतील सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम १०० ते ११० रुपयांनी घट झाली आहे.
 
जागतिक पातळीवरील क्रूड (कच्च्या) तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे. परवा कच्च्या तेलाचा मुबलक साठा असल्याचे व मध्यपूर्वेतील वातावरण स्थिर झाल्याने तेलाचे दर स्वस्त झाले होते. परंतु आज सकाळी तेल साठा मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने पुन्हा कच्च्या तेलाचे भाव वधारले आहेत. याशिवाय फेडरल व्याजदर कपात पुढे ढकलल्याने व साठ्यात कपात झाल्याने आता नवे दर लागू झाले आहेत. क्रूड तेलाच्या WTI Future निर्देशांकात १.०१ टक्क्यांनी व Brent क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.८६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स क्रूड निर्देशांकात १.१७ टक्क्यांनी वाढ होत प्रति बॅरेल किंमत ६६६४.०० पातळीवर पोहोचली आहे.
 
आज बाजारातील एकूण परिस्थिती चिंताजनक नसली तरी आज पाचव्या दिवशी बाजारातील मरगळ कायम राहिली होती. विकण्याच्या दबावाखाली गुंतवणूकदार आल्याने बाजारात नकारात्मक वातावरण कायम होते. मुख्यतः अमेरिकन फेडरल व्याजदर कपात पुढे ढकलली असल्याने बाजारात देशांतर्गत गुंतवणूकदारांनी भारतीय विशेष घटनांवर लक्ष केंद्रित केले होते परंतु समाधानकारक कंपन्याचे तिमाही निकाल न आल्याने, निवडणुकीच्या तोंडावर अनिश्चितता, तसेच परदेशी गुंतवणूकदारांनी सावधतेचा पवित्रा घेत मोठी गुंतवणूक न केल्यामुळे, तसेच देशांतर्गत गुंतवणूकदारांनीही गुंतवणूक न वाढवल्याने अखेरीस बाजारात 'नफा बूकिंग ' फेज कायम राहिली होती.
 
मोठ्या पातळीवर बाजार पडले असले तरी आगामी निवडणुकीनंतर परिस्थिती बदलण्याचे संकेत तज्ज्ञांकडून मिळत आहेत. विशेषतः हेवी लार्जकॅप बरोबरच मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण झाल्याने बाजार निर्देशांकात मोठी घसरण झाली. दुसरीकडे कुठलाही नवीन सकारात्मक बदल होण्यासाठी आवश्यक असलेली कुठलीही मोठी घडामोड न घडल्याने बाजारात रॅलीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले नाही.
 
दुसरीकडे रुपया व क्रूडमधील घसरणीमुळे त्यात अधिक तोटा झाला आहे. बाजारातील कंपन्याचे बाजार भांडवल घसरल्याने गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान झाले आहे. विशेषतः रुपयांत घसरण झाल्याने मोठ्या प्रमाणात परदेशी चलनाच्या साठ्यात तूट झाली आहे. आज बाजारातील VIX Volatility Index ५ ते ६ टक्क्यांनी वाढल्याने समभागात मोठे चढ उतार पहायला मिळाले आहेत.
 
जागतिक पातळीवरील निर्देशांकात मोठी वाढ झालेली असतानाही त्यांचे संकेत भारतीय बाजारात परिणामकारक ठरले नाहीत. थोड्याच वेळापूर्वी बँक ऑफ इंग्लंडने व्याजदर ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवल्याची घोषणा केल्याने युरोपियन बाजारात मोठा
'ट्रिगर ' निर्माण होण्याची शक्यता आहे. महागाई वर नियंत्रण ठेवताना अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी बहुमताने बँकेने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता याचा जागतिक शेअर बाजारात काय परिणाम होतो ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकेतील DoW Jones बाजारात वाढ झाली असून उर्वरित S & P 500 बाजार काल अखेरच्या सत्रात सपाट राहिला. NASDAQ बाजारात थोडी घसरण झाली होती. युरोपातील तिन्ही FTSE 100 , DAX, CAC 40 बाजारात वाढ झाली आहे.आशियाई बाजारात NIKKEI बाजारात घसरण झाली असून उर्वरित HANG SENG SHANGHAI शेअर बाजारात वाढ झाली आहे. गुंतवणूकदारांच्या मानसिक दबावातुन निफ्टी २२००० हून खाली घसरल्याने बाजारात रॅली कधी येणार याची गुंतवणूकदार आतुरतेने वाट पाहत असल्याची शक्यता आहे.
 
बीएसईत आज गुंतवणूकदारांना टाटा मोटर्स, एम अँड एम, एसबीआय, एचसीएलटेक, इन्फोसिस या समभागात फायदा झाला असून लार्सन, एशियन पेंटस, आयटीसी, इंडसइंड बँक, बजाज फायनान्स, एनटीपीसी, बजाज फिनसर्व्ह, टाटा स्टील, एचडीएफसी बँक, सनफार्मा, रिलायन्स विप्रो, पॉवर ग्रीड, टेक महिंद्रा, नेस्ले, भारती एअरटेल, एक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, एचयुएल, अल्ट्राटेक सिमेंट, टायटन कंपनी, कोटक महिंद्रा, टीसीएस या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
 
एनएसईत गुंतवणूकदारांना हिरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, एम अँड एम, बजाज ऑटो, एसबीआय, इन्फोसिस एचसीएलटेक या समभागात फायदा झाला आहे तर नुकसान लार्सन, एशियन पेंटस, बीपीसीएल, कोल इंडिया, ओएनजीसी, आयटीसी, श्रीराम फायनान्स, डिवीज, जेएसडब्लू स्टील, अदानी एंटरप्राईज, ब्रिटानिया, डॉ रेड्डीज,बजाज फायनान्स, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, इंडसइंड बँक, अदानी पोर्टस, टाटा स्टील, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी बँक,पॉवर ग्रीड, सिप्ला, सनफार्मा, रिलायन्स, विप्रो, एक्सिस बँक, भारती एअरटेल, नेस्ले, ग्रासीम, अल्ट्राटेक सिमेंट, आयशर मोटर्स, अपोलो हॉस्पिटल या समभागात झाले आहे.
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना, जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले, 'चौथ्या तिमाहीतील कमाई आणि सार्वत्रिक निवडणुकीच्या अनिश्चिततेमुळे सावधगिरी बाळगून, व्यापक बाजारपेठेत अस्थिरता दिसून आली, ज्यामुळे गुंतवणूकदार बाजूला राहिले. बाजार २२००० च्या शारीरिक पातळीच्या खाली घसरल्याने अल्पावधीत हा कल कायम राहण्याची आम्हाला अपेक्षा आहे. आजच्या BOE धोरणाच्या बैठकीपूर्वी आणि पुढील आठवड्यात होणाऱ्या यूएस चलनवाढीच्या आकड्यांपूर्वी जागतिक निर्देशांक संमिश्र संकेतांसह व्यापार करत आहेत.'
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, 'आज निफ्टी १.५० % च्या मोठ्या कपातीसह बंद झाला आणि २२००० च्या मानसशास्त्रीय चिन्हाच्या खाली बंद झाला तर सेन्सेक्स १.४५ % नी ७२४०४ वर बंद झाला. निफ्टी ऑइल अँड गॅस आणि निफ्टी एनर्जी हे अनुक्रमे ३.१५% आणि २.९७ % नी घसरले.
 
भारत फोर्ज हिरवाईत बंद झाला. गुंतवणूकदारांनी ऑटो आणि संरक्षण घटक निर्मात्याचे उत्कृष्ट Q4FY24 निकाल आणि व्यवस्थापन समालोचनाचे कौतुक केले, ज्यामुळे स्टॉकला मागील सत्रापेक्षा १६ टक्के वाढ करण्यास मदत झाली. भारत फोर्जने Q4FY24 साठी ५९.३% वार्षिक निव्वळ नफ्यात ३८९.६ कोटी रुपयांची वाढ नोंदवली. १६.६% वार्षिक वाढीसह महसूल २३३८.५ कोटी रुपये झाला.
 
ब्लॅकस्टोन-समर्थित आधार हाउसिंग फायनान्सच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) साठी बोली लावण्याच्या दुसऱ्या दिवशी ६२% सबस्क्रिप्शन दर दिसला. विक्रीत ७ कोटी इक्विटी शेअर्स असले तरी गुंतवणूकदारांनी ४.३२ कोटी इक्विटी शेअर्ससाठी बोली लावली होती.निफ्टीमध्ये हेरो मोटोकॉर्प, टाटा मोटर्स, एमअँडएम, बजाज ऑटो आणि एसबीआय हे सर्वाधिक लाभधारक आहेत तर लार्सन, एशियन पेंट्स, बीपीसीएल, कोल इंडिया आणि ओएनजीसी यांचा तोटा झाला.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी प्रतिक्रिया देताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव एनालिस्ट ऋषिकेश येडवे म्हणाले, ' देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक गुरुवारी खाली उघडले आणि दिवसभर दबावाखाली राहिले. परिणामी, निर्देशांक २२००० च्या मानसशास्त्रीय पातळीच्या खाली बंद झाला आणि २१९५७.५ वर नकारात्मक पातळीवर स्थिरावला.
 
तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांकाने वाढत्या चॅनेल सपोर्टला तोडले आहे, जे २२१०० स्तरांजवळ ठेवले होते. अशा प्रकारे, २२१०० निर्देशांकासाठी तात्काळ अडथळा म्हणून काम करेल, त्यानंतर २२४०० जेथे २१-दिवसांचे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज (DEMA) ठेवले जाते. गेल्या महिन्यात, निर्देशांकाने सुमारे २१७८० स्तरांवर आधार घेतला आहे आणि १००-DEMA २१८१७ च्या जवळ आहे. अशा प्रकारे, डाउनसाइडवर, २१७८०-२१८२०निर्देशांकासाठी पुढील प्रमुख आधार म्हणून काम करेल. जर निर्देशांक २२७५० च्या खाली राहिला तर कमजोरी आणखी वाढू शकते.'
 
बँक निफ्टी एका अंतराने उघडला आणि दिवसभर दबावाखाली राहिला आणि तो ४७७०० वर बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या, निर्देशांकाने ४७७०० चा आधार तोडला आहे, जो कमजोरी दर्शवतो. जोपर्यंत निर्देशांक ४७७००च्या खाली राहील तोपर्यंत सतत कमजोरी कायम राहील. डाउनसाइडवर, निर्देशांकासाठी पुढील प्रमुख समर्थन ४७०५०स्तरांजवळ ठेवलेले आहे, जेथे १००-दिवस एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज (DEMA) स्थित आहे. उलटपक्षी, बँक निफ्टी ४७७०० च्या वर टिकून राहिल्यास, ४८२००-४८५००पर्यंत रिलीफ रॅली शक्य आहे.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना कोटक सिक्युरिटीजचे हेड इक्विटी रिसर्च श्रीकांत चौहान म्हणाले ,आज, बेंचमार्क निर्देशांकांमध्ये जोरदार विक्री झाली, निफ्टी २४५ अंकांनी घसरला तर सेन्सेक्स १०६२ अंकांनी खाली आला. क्षेत्रांमध्ये, जवळजवळ सर्व प्रमुख क्षेत्रीय निर्देशांकांनी उच्च स्तरावर नफा बुकींग पाहिली परंतु ऊर्जा आणि धातू निर्देशांकांनी सर्वाधिक ३ टक्के घसरण केली. तांत्रिकदृष्ट्या, म्यूट ओपनिंग मार्केटने २२०००/७३२०० सपोर्ट लेव्हलचा भंग केल्यावर आणि ब्रेकडाउननंतर विक्रीचा दबाव वाढला.
 
दैनंदिन चार्टवर, निर्देशांकाने दीर्घ मंदीची मेणबत्ती तयार केली आहे, जी सध्याच्या पातळीपासून पुढील कमजोरीला समर्थन देते. आमचे मत आहे की, अल्पकालीन बाजाराचा पोत कमकुवत आहे परंतु तात्पुरत्या ओव्हरसोल्ड परिस्थितीमुळे, आम्ही सध्याच्या पातळीपासून एक तांत्रिक पुलबॅक रॅली पाहू शकतो. आता व्यापाऱ्यांसाठी, २२०००/७२५५० लक्ष ठेवण्यासाठी महत्त्वाची पातळी म्हणून काम करेल. २२०००/७२७५०च्या वर,बाजार २२१००-२२१५०/७२३००-७२५०० पर्यंत बाउन्स बॅक करू शकतो.उलट पक्षी, २२०००/७२५५० च्या खाली कमकुवत भावना चालू राहण्याची शक्यता आहे. ज्याच्या खाली बाजार २१८५०-२१८००/  ७२१००-७२०००पर्यंत घसरू शकतो.'
 
बाजारातील रुपयांच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले, ' सुरुवातीला किरकोळ नफ्यासह रुपया ८३.५० वर सपाट बंद झाला, पण नंतर भांडवली बाजारातील विक्रीमुळे रुपयाच्या वरच्या वाटचालीला मर्यादा आल्याने ते समर्पण केले. या सत्राचे वैशिष्ट्य होते बाजूला व्यापार आणि डॉलर निर्देशांकावरील महत्त्वपूर्ण डेटाचा अभाव. रुपयाची श्रेणी नजीकच्या काळात ८३.२५ आणि ८३.७० दरम्यान राहण्याची अपेक्षा आहे.'