डेटा कंझमशनमध्ये रिलायन्स जिओ जगात नंबर १ एअरटेलला मागे टाकले

ट्रायने दिलेल्या अहवालात स्पष्ट

    04-May-2024
Total Views |

Reliance
 
 
मुंबई: ट्रायने (Telecom Regulatory Authority of India) ने मार्च महिन्यातील सबस्क्राईबरची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीत रिलायन्स जिओने भारती एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया या दोन कंपन्यांना सबस्क्राईबर बेसमध्ये मागे टाकले आहे. मार्च २०२४ महिन्यातील सर्वाधिक युजर रिलायन्स जिओचे असल्याचे ट्रायने आपल्या अहवालात म्हटले आहे.
 
सर्वाधिक युजर जिओ (२.१४ दशलक्ष), भारती एअरटेल (१.७५ दशलक्ष) व्होडाफोन आयडियाने ६८४५३० गमावत १२७.६९ दशलक्ष युजर असल्याचे ट्रायने म्हटले आहे. ३१ मार्च २०२४ पर्यंत रिलायन्स जिओ प्रथम येत त्यानंतर एअरटेल, व्होडाफोन आयडिया, बीएसएनएल यांचा क्रमांक लागला.
 
भारताच्या एकूण टेलिफोन सबस्क्राईबरमध्ये ०.१३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मार्च अखेरपर्यंत १९७.७५ दशलक्षावरून सबस्क्राईबरमध्ये वाढ होत ११९९.२८ दशलक्षावर युजर (वापरकर्ते) पोहोचले आहेत.रिलायन्स जिओ जगातील डेटा कंझमशन मध्ये प्रथम क्रमांकावर आले असुन जिओने चीनलाही मागे टाकले आहे. जिओचा ५ जी सबस्क्राईबरमध्ये वाढ होत ही संख्या १०८ दशलक्षावर पोहोचली आहे. जिओच्या मार्केट शेअरमध्ये ४०.३० टक्क्यांपर्यंत वाढ झाली आहे तर एअरटेलचे मार्केट शेअर ३३.१० टक्क्यांवर पोहोचला असून व्होडाफोन आयडियाचे मार्केट शेअर १८.८६ टक्क्यांवर पोहोचले आहे.