खुष खबर : ' तर 'ईपीएफओ सदस्यांना ५०००० रुपयांचा बोनस जाहीर!

सलग २० वर्ष ईपीएफओचे सदस्य असणे बंधनकारक

    04-May-2024
Total Views |

EPFO
 
 
मुंबई: ईपीएफओ (EPFO) नोकरदार माणसाला त्याचे आर्थिक भविष्य सुकर करण्यास मदत करते. भविष्यातील दीर्घकालीन निधी तरतूदीसाठी भविष्य निर्वाह निधी काही येतो. अशातच एक चांगली बातमी आली आहे. तुमचे ईपीएफओ खाते असल्यास तुम्हाला एक नवा फायदा होणार आहे.त्यातील एक तरतूद ' लॉयल्टी कम बेनिफिट प्रोव्हीजन ' या कायद्याच्या तरतुदीनुसार ईपीएफओचे खाते असल्यास तुम्हाला ५०००० रुपयांचा बोनस मिळणार आहे.या बेनिफिटसाठी पात्र होण्यास मात्र तुम्ही सलग २० वर्ष खातेदार असण्याची आवश्यकता असणार आहे.
 
सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT) या सरकारी संस्थेने ही तरतूद ईपीएफओ सदस्यांसाठी केली आहे.केंद्र सरकारने या योजनेला मान्यता दिली असल्याने या योजनेची आता अमंलबजावणी होणार आहे. या मिळणाऱ्या बोनसचे मूल्यमापन तत्सम व्यक्तींच्या वेतनावर अवलंबून असणार आहे.
 
ही योजनेचा परतावा घेण्यासाठी कर्मचाऱ्यांने हे खाते चालू ठेवण्याची आवश्यकता असणार आहे. भले नोकरी बदलली तरी तुम्ही खात्याबद्दलची माहिती जुन्या अथवा नव्या कंपनीला देऊ शकत जेणेकरून तुमची वर्गणी सुरु राहील. या बोनसमुळे सदस्यांना आर्थिक लाभ होऊन भविष्यनिर्वाह निधीत दिलासा मिळणार आहे.