म.रे.वरील मेगाब्लॉकचा 'मेगा'इफेक्ट; मुलुंड-ऐरोली मार्गावर वाहतूक कोंडी!

31 May 2024 15:47:42
central railway megablock
 

मुंबई :       मध्ये रेल्वेवरील ३ दिवसीय जम्बो मेगाब्लॉकमुळे रेल्वे प्रवाशांचे प्रचंड हाल होताना दिसून येत आहे. या मेगाब्लॉकमुळे पूर्वद्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळत आहे. तसेच, खाजगी वाहनाने मुंबईकर कामाच्या दिशेने निघत असल्याने मुलुंड-ऐरोली मार्गावर वाहतूक कोंडी सामना करावा लागत आहे.

दरम्यान, सीएसएमटी व ठाण्यातील फलाटाच्या कामासाठी घेण्यात आलेल्या ब्लॉकमुळे मुलुंड ते कांजूरमार्गच्या दरम्यान पूर्व द्रुतगती मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळत आहे. त्याचबरोबर, ट्रान्स हार्बर ऐरोली मार्गावरदेखील वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्याचे चित्र आहे.


मध्य रेल्वेवर शक्रवारी मध्यरात्रीपासून १२:३० वाजल्यापासून रविवारी दुपारी ३:३० पर्यंत जम्बो मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. या जम्बो मेगाब्लॉकमुळे प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होताना दिसून येत आहे. मध्य रेल्वेकडून एकूण ९३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, ९३० लोकल फेऱ्यांपैकी शुक्रवारी १६१, शनिवारी ५३४, रविवारी २३५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ६३ तासांच्या जम्बो मेगाब्लॉक असल्याने आवश्यकता असल्यास रेल्वेने प्रवास करा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे. 
 

 
Powered By Sangraha 9.0