आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा : मध्य रेल्वे

मध्य रेल्वेचे नागरिकांना आवाहन

    30-May-2024
Total Views |

thane
मुंबई, दि.३०: प्रतिनिधी मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर आजपासून ६२ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे.३० मे रोजी रात्री पासून हा ब्लॉक सुरू होईल. डाऊन फास्ट लाईन साठी ६२ तासांचा तर, अप स्लो लाईनवर १२ तासांसाठी हा ब्लॉक असणार आहे. दरम्यान, १ आणि २ जूनला सीएसएमटी स्थानकात ३६ तासांचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा असे आवाहन मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी केले आहे.
सीएसएमटी आणि ठाणे दरम्यान ३१ मे ते २ जून दरम्यान महत्त्वपूर्ण ब्लॉक घेण्यात येणार आहे. हे प्लॅटफॉर्म १०/११चा विस्तार आणि ठाण्यातील प्लॅटफॉर्म ५ आणि ६चे रुंदीकरण करण्यासाठी घेण्यात येणार आहे. उत्तम प्रवासी वाहतूक आणि महत्वाच्या कामासाठी आहे. "आम्ही ट्रेन रद्द करणे कमी करण्याचा प्रयत्न करतो आहे आणि प्रवाशांना प्रवास मर्यादित ठेवण्याची विनंती करतो. खरोखर अपरिहार्य असेल तेव्हाच प्रवास करा."असे आवाहन मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्नील नीला यांनी केले.
मध्य रेल्वेच्या ठाणे स्थानकावर ६२ तासांचा ब्लॉक
मध्य रेल्वेचे दिलेल्या माहितीनुसार, १ आणि २ जूनला सीएसएमटी स्थानकात ३६ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. सीएसएमटी स्थानकात १० आणि ११ नंबरच्या फलाटची लांबी वाढवण्यासाठी हा जंबो ब्लॉक घेण्यात येणार आहे. फलाटाचा विस्तार केल्यानंतर १६ किंवा त्यापेक्षा जास्त डब्यांच्या गाड्या या प्लॅटफॉर्मवर थांबवता येतील. तर दुसरीकडे ठाणे स्थानकात देखील एक ब्लॉक घेण्यात येणार आहे.

फलाट क्रमांक ५ आणि ६ ची रुंदी वाढवण्यासाठी ब्लॉक
ठाणे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक ५ आणि ६ ची रुंदी वाढवण्याच्या कामासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ५ आणि ६ सर्वात व्यस्त प्लॅटफॉर्म आहे. या फलाटाची जर रुंदी वाढवली तर जास्त प्रवासी त्या ठिकाणी उभे राहू शकतील. प्रयत्न असा आहे की, दोन्ही ब्लॉक एकच वेळी घेण्यात यावा, कारण प्रवाशांना एकदाच त्रास होईल, सीएसएमटी येथील ब्लॉक आधीच निश्चित आहे, त्यानंतर आता ठाणे स्थानकावरील ब्लॉकही निश्चित करण्यात आला असून गुरुवारी रात्रीपासूनच हा ब्लॉक सुरु होईल. ठाणे स्थानकातील ब्लॉक ६२ तासांचा असेल. गुरुवारी, ३० मे रोजी रात्रीपासून हा ब्लॉक सुरू होईल. डाऊन फास्ट लाईनसाठी ६२ तासांचा ब्लॉक तर अप स्लो लाईनसाठी १२ तासांचा हा ब्लॉक असणार आहे.