मुंबई : शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सध्या राज्यातील वातावरण चांगलंच तापलं आहे. जितेंद्र आव्हाडांनी बुधवारी मनुस्मृती दहन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडला. त्यामुळे त्यांच्या कृतीचा सगळीकडे विरोध करण्यात येत आहे.
दि. २९ मे रोजी महाड चवदार तळे येथे जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या विरोधात आंदोलन केले. यावेळी त्यांच्याकडून बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असलेले पोस्टर फाडण्यात आले. त्यामुळे भाजप आक्रमक झाली असून राज्यभरात आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात येत आहे.
हे वाचलंत का? - अखेर ससूनमधील दोन डॉक्टर निलंबित!
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेनुसार ठाणे, कोल्हापूर, नागपूर, अकोला अशा अनेक ठिकाणी जितेंद्र आव्हाडांविरोधात आंदोलन करण्यात आले. याशिवाय त्यांच्यावर वेगवेगळ्या ठिकाणी गुन्हादेखील दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, आव्हाडांनी याप्रकरणी जाहीर माफी मागितली आहे.