शेअर बाजार विश्लेषण: शेअर बाजारात भूकंप ! सेन्सेक्स ७३२.९६ अंशाने ७३८७८.१५ पातळीवर निफ्टी ५० निर्देशांक १७२.३५ अंशाने २२४७५.८५ पातळीवर

फार्मा, हेल्थकेअर समभागात वाढ तर बँक निर्देशांकात घसरण !

    03-May-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण : आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घट झाली आहे. सेन्सेक्स निफ्टी बँक निर्देशांकात मोठी घसरण झाली असुन आज बाजारातील नकारात्मकता कायम राहिली आहे. विशेषतः परदेशी गुंतवणूकदारांनी आपले धनसंचय काढून घेतल्यानंतर बाजारात अधिक फटका बसला आहे. परदेशी गुंतवणूकदारांनी सुमारे ९६४ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतल्याने बाजारात पडझड झाली आहे.सेन्सेक्स निर्देशांक ७३२.९६ अंशाने घसरत ७३८७८.१५ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक १७२.३५ अंशाने घसरत निर्देशांक २२४७५.८५ पातळीवर पोहोचला आहे.
 
सेन्सेक्स व निफ्टी बँक निर्देशांकात मोठी घट झाली आहे. सेन्सेक्स बँक निर्देशांकात ३३७.७० अंशाने घटत ५५४०९.०९ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी बँक निर्देशांकात ३०७.५० अंशाने घसरण होत ४८९२३.५५ निर्देशांक पातळीवर पोहोचला आहे. सेन्सेक्समध्ये ०.६१ व निफ्टीत ०.३५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. बीएसईत मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.२१ व ०.५५ टक्क्यांनी घसरण झाली आहे. एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.३५ व ०.४९ टक्क्यांनी घसरण झाली आहे.
 
एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये बहुतांश निर्देशांकात घसरण झाली आहे. विशेषतः सर्वाधिक घसरण रियल्टी (१.३%), प्रायव्हेट बँक (०.७३%) आयटी (०.८९%) पीएसयु बँक (०.७६ %) या समभागात झाली असुन सर्वाधिक वाढ मिड स्मॉल हेल्थकेअर (०.३३%) फार्मा (०.०५ %) हेल्थकेअर (०.०८%) समभागात झाली आहे.
 
बीएसईत आज एकूण ३९५८ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १५३४ समभाग वधारले असून २३०६ समभागात घसरण झाली आहे. २५६ समभागातील मूल्यांकनात ५२ आठवड्यातील आज सर्वाधिक वाढ झाली आहे तर १८ समभागात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण ८ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ५ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
एनएसईतील २७३५ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील ९८० समभाग आज वधारले असून १६४५ समभागात आज घसरण झाली आहे. १४७ समभागाचे मूल्यांकन आज ५ आठवड्यातील सर्वाधिक राहिले असून ५२ आठवड्यातील १२ समभागाचे मूल्यांकन सर्वाधिक घसरले आहे.एकूण १०६ समभाग अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ५८ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
ओपेक राष्ट्रांनी आज क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ केल्याने दुपारपर्यंत क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे. आपल्या उत्पादनावरील आऊटपुट किंमतीत वाढ झाल्याने ओपेक (OPEC) राष्ट्रांनी भाववाढ केली होती.मध्य पूर्वेकडील दबाव शांत झाला तरी वाढत्या मागीबरोबर तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने निर्देशांकात वाढ झाली आहे. WTI Future क्रूड निर्देशांकात ०.१५ टक्क्यांनी वाढ झाली असून Brent Crude निर्देशांकात ०.१९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange) मध्ये क्रूड तेलाच्या निर्देशांकात ०.१४ टक्क्यांनी वाढ झाली असुन देशातील क्रूड तेलाच्या किमती प्रति बॅरेल ६६१०.०० रुपयावर पोहोचल्या आहेत.
 
दुसरीकडे जागतिक पातळीवरील सोन्याच्या युएस गोल्ड फ्युचर निर्देशांकात दुपारपर्यंत घट झाल्याने भारतातील सोन्याच्या दरात घट झाली आहे.युएस गोल्ड फ्युचर निर्देशांक दुपारी ४ वाजेपर्यंत ०.०४ टक्क्यांनी घसरण २३०८.८० पातळीवर पोहोचला आहे. भारतातील एमसीएक्स सोने निर्देशांकात ०.१६ टक्क्यांनी घट झाली आहे. भारतातील सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम दर ५४० रुपयांना घसरत ७१७३० रुपयांवर पोहोचला आहे.
 
बीएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४०६.२४ लाख कोटी होते. एनएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल ४०२.९० लाख कोटी होते. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत चार पैशाने वधारल्यानंतर रुपया ८३.४३ रुपयांवर स्थिरावला होता.
 
आज बाजारातील एकूण परिस्थिती पोषक राहिली नाही.सकाळी वाढलेले मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये घसरण झाल्यानंतर बाजारात घसरण झाली आहे. याशिवाय लार्जकॅप मध्ये झालेली घसरण पाहता बाजारात गुंतवणूकदारांनी आखडता हात घेतला आहे.प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार आज मोठ्या प्रमाणात परदेशी गुंतवणूकदारांनी आपली गुंतवणूक काढून घेतली होती.दुपारी बाजार १३०० अंशापर्यंत घसरत खाली गेले होते परंतु अखेरच्या सत्रात ते वधारल्याने गुंतवणूकदारांना नुकसान कमी झाले. विशेषतः ब्लू चिप्स कंपन्यांच्या समभागात घसरण झाल्यानंतर बाजारात मोठी घसरण झाली आहे. उदाहरणार्थ बजाज फायनान्स समभाग वधारला असला तरी रिलायन्स, एचडीएफसी बँक, भारती एअरटेल अशा मोठ्या समभागात घसरण झाल्याने बाजारात घसरण झाली आहे. मुख्यत्वे गुंतवणूकदारांनी विक्री दबावाचा मार्ग स्विकारल्यानंतर बाजारात पिछेहाट झाली आहे.
 
बाजारातील समभागात आज मोठ्या प्रमाणात चढ उतार पहायला मिळाला असल्याने बाजारातील India VIX (Volatility  Index) या निर्देशांकात १२ टक्क्यांनी वाढ झाली होती.फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची चिन्हे मावळल्या खेरीज येणारे तिमाही निकाल, बाजारातील स्तब्धता व निवडणूकीची धामधूम यामुळे बाजारात पीछेहाट झाली होती.
 
बीएसईत बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, एम अँड एम समभागात वाढ झाली होती तर लार्सन, मारूती सुझुकी, रिलायन्स, भारती एअरटेल, जेएसडब्लू स्टील, नेस्ले, एनटीपीसी, अल्ट्राटेक सिमेंट, टेक महिंद्रा, टाटा मोटर्स, कोटक महिंद्रा, इंडसइंड बँक, एशियन पेंटस,पॉवर ग्रीड, टायटन कंपनी, एचसीएलटेक, आयटीसी, एक्सिस बँक, टाटा स्टील, सनफार्मा, विप्रो,एसबीआय, इन्फोसिस, आयसीआयसीआय बँक या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
 
एनएसईत कोल इंडिया, ग्रासीम, ओएनजीसी, डॉ रेड्डीज, हिंदाल्को, बजाज फिनसर्व्ह, बजाज फायनान्स, सिप्ला, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, श्रीराम फायनान्स, आयसीआयसीआय बँक, एसबीआय, इन्फोसिस या समभागात वाढ झाली आहे. तर ल लार्सन, मारूती सुझुकी, रिलायन्स, भारती एअरटेल, कोटक महिंद्रा, एचडीएफसी बँक, जेएसडब्लू स्टील, अल्ट्राटेक सिमेंट, एशियन पेंटस, अदानी एंटरप्राईज, इंडसइंड बँक, टाटा मोटर्स, अदानी पोर्टस, टेक महिंद्रा, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, एनटीपीसी, टायटन कंपनी, एचसीएलटेक,पॉवर ग्रीड, एचडीएफसी बँक, बीपीसीएल, एक्सिस बँक, आयटीसी, सनफार्मा, टीसीएस, टाटा स्टील, एचयुएल, डिवीज, ब्रिटानिया, आयशर मोटर्स या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना, बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले, 'आज निफ्टी ०.७६ % ने नकारात्मक नोट वर बंद झाला तर सेन्सेक्स ०.९८ % ने खाली आला. निफ्टी इन्फ्रा आणि निफ्टी रिॲल्टी अनुक्रमे १.२९ आणि १.०३ % नी घसरले.मागणीतील अनिश्चितता आणि उच्च व्याजदरांमुळे OPEC+ पुरवठा मर्यादित करणे सुरू ठेवेल या अपेक्षेमुळे तेलाच्या किमतीतील आजची किरकोळ वाढ विक्रीच्या मर्यादेत होती, ज्यामुळे किमती तीन महिन्यांतील त्यांच्या सर्वात कमी साप्ताहिक तोट्यापर्यंत पोचल्या.
 
आजच्या यूएस ISM सेवांचा PMI डेटा आणि नॉन-फार्म पेरोल्सच्या अहवालापूर्वी, गुंतवणूकदार सावध राहतात. सकारात्मक नॉनफार्म पेरोल बाजाराला मदत करू शकतात, परंतु नकारात्मक डेटा बाजाराला हानी पोहोचवू शकतो. भारत फोर्ज लिमिटेड उत्तर अमेरिकन क्षेत्रांमध्ये 8 व्या वर्गाच्या ट्रक ऑर्डर एप्रिलमध्ये नऊ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर गेल्यानंतर बंद होण्याच्या वेळी १.७३ % ने किंचित घट झाली. निफ्टीमध्ये L&T, मारुती सुझुकी, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया आणि भारती एअरटेल यांचा सर्वाधिक तोटा झाला, तर कोल इंडिया, ग्रासिम इंडस्ट्रीज, ONGC, डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीज आणि हिंदाल्को इंडस्ट्रीज यांचा समावेश होता.
 
आजच्या बाजारावर प्रतिक्रिया देताना, जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले,'यूएस नॉन-फार्म पेरोल रिलीज होण्याआधी नफा बुकिंग आणि काही प्रमाणात सावधगिरी बाळगल्यामुळे बाजारात विक्रीचा दबाव निर्माण झाला. तथापि, आतापर्यंतच्या चौथ्या तिमाहीच्या कमाईमध्ये लक्षणीय नकारात्मक आश्चर्यांची अनुपस्थिती, तेलाच्या किमतीतील घसरणीसह, कदाचित डाउनसाईड कमी करण्यास मदत करते जरी सुधारणा व्यापक आधारावर होती, परंतु FII च्या स्थानिक बाजारातील प्रदर्शनाच्या संयमामुळे लार्ज-कॅप स्टॉक हा प्रमुख कमी कामगिरी करणारा होता.'
 
बाजारातील सोन्याच्या दराविषयी एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट कमोडिटी व करंसी, जतीन त्रिवेदी म्हणाले, 'संध्याकाळनंतर महत्त्वाच्या नॉनफार्म पेरोल आणि बेरोजगारी डेटा रिलीज होण्याआधी सोन्याच्या किमती रेंज-बाउंड राहिल्या, $ २३०० मार्कच्या आसपास घिरट्या घालत आहेत. बाजार अंदाज कमी पगार सुचवतात, जे सोने खरेदीदारांना स्वारस्य ठेवू शकतात, अपेक्षेपेक्षा कमकुवत नॉनफार्म पेरोल डेटा सामान्यत: सोन्याच्या किमतींना समर्थन देतो, याउलट,अपेक्षेपेक्षा जास्त डेटा सध्या ७१२५० च्या रेझिस्टन्ससह ७०००० पातळीच्या आसपास आहे.दोन्ही बाजूंनी १०००-१५०० रुपये गुंतवणूकदार संभाव्य बाजाराच्या दिशेसाठी डेटा रिलीझचे बारकाईने निरीक्षण करत आहेत.'
 
रुपयावरील हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट कमोडिटी व करंसी, जतीन त्रिवेदी म्हणाले, 'रुपयाने ८३.३३ -८३.४५ च्या मर्यादेत व्यवहार केले, सकारात्मक अंतराच्या सुरुवातीनंतर किरकोळ ताकद दाखवली. तथापि, ८३.४२ च्या आसपास बंद होण्यापूर्वी किमती ८३.३३ वरून ८३.४५ पर्यंत खाली सरकल्या. बाजारातील सहभागी US नॉनफार्म पे शेड्यूलमधील डेटा रिलीझसाठी उत्सुकतेने वाट पाहत आहेत. संध्याकाळी, बेरोजगारी डेटासह हे प्रकाशन हे प्रमुख संकेतक आहेत जे कदाचित बाजारातील सहभागींना सक्रिय ठेवतील कारण ते फेडच्या चलनविषयक धोरण निर्णयांसाठी अंतर्दृष्टी प्रदान करतात.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव रिसर्च ह्रषीकेश येडवे म्हणाले,'शुक्रवारी अनुकूल जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांकांनी उच्चांक उघडला.त्यानंतर, निफ्टीने २२७९४.७० चा सार्वकालिक उच्चांक नोंदवला. त्यानंतर अपेक्षेप्रमाणे बाजारात मोठ्या प्रमाणात नफा बुकींग झाली आणि निर्देशांकाने निष्कर्ष काढला. २२४७६ वर एक नकारात्मक नोंद झाली आहे.२२७८० -२२८०० कमी कालावधीत निर्देशांकासाठी एक मजबूत अडथळा म्हणून काम करेल, जे सर्व-वेळ उच्च जवळ एक मंदीचे गुंतलेली मेणबत्ती तयार करेल, जेथे ३४ डेज एक्सपोनेन्शिअल मूव्हिंग एव्हरेज (DEMA) जर इंडेक्स २२३५० वर टिकून राहिल, तर कमी कालावधीसाठी २२०००-२२८००च्या बँडमध्ये कमकुवत होण्याची अपेक्षा आहे मजबूत समर्थन पातळी म्हणून काम करेल, तर २२७०० आणि २२८०० निर्देशांकासाठी अडथळे म्हणून काम करतील.
 
बँक निफ्टी सकारात्मक टोनवर उघडला, परंतु विक्रीच्या तीव्र दबावामुळे निर्देशांक ४८९२४ वर नकारात्मक नोटवर बंद झाला. तांत्रिकदृष्ट्या, साप्ताहिक स्केलवर, निर्देशांकाने सर्वकालीन उच्च जवळ एक शूटिंग स्टार कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे, जो ४९९७५ पातळीच्या जवळ मजबूत प्रतिकार दर्शवतो. ४८,३४२ च्या खाली कायम राहिल्यास बँक निफ्टी आणखी कमजोर होऊ शकते.अल्प मुदतीसाठी, ४८५०० आणि ४८३०० समर्थन बिंदू म्हणून काम करतील, तर ४९५०० आणि ५०००० प्रतिरोधक बिंदू म्हणून काम करतील."