Q4 Results: तिमाही निकाल - टायटन कंपनीच्या नफ्यात ७.१टक्क्यांनी वाढ निव्वळ नफा ७८६ कोटी

आज समभागात १.५ टक्क्यांनी घसरण

    03-May-2024
Total Views |

titan
 
 
मुंबई: टायटन कंपनीने आपला चौथ्या तिमाहीचा निकाल जाहीर केला आहे. कंपनीला ३१ मार्च २०२४ पर्यंत इयर बेसिसवर ७८६ कोटींचा नफा झालेला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत कंपनींच्या नफ्यात ७.१ टक्क्यांनी वाढ झाली आहे. टायटन कंपनीच्या उप ब्रँड असलेले तनिष्क, कार्टलेन यांनाही चांगला नफा झाला आहे. मुख्यतः लग्नाच्या सिझन मध्ये मागणीत वाढ झाल्याने टायटन कंपनीच्या विक्रीत वाढ झाली आहे. मागील वर्षाच्या तिमाहीत कंपनीला ७३४ कोटींचा निव्वळ नफा झाला होता.
 
कंपनीच्या ईबीआयटीडीएमध्ये (कर व इतर खर्च पूर्व नफा) मार्च २०२४ पर्यंत ११.८ टक्क्यांनी वाढत २९७.८ कोटींवर पोहोचला आहे. कंपनीच्या निव्वळ विक्रीत जानेवारी ते मार्च तिमाहीत १७ टक्क्यांनी इयर ऑन इयर (YoY) बेसिसवर १७ टक्क्यांनी वाढ होत १००४७ कोटींवर पोहोचले आहे. मागील वर्षी विक्री ८५५३ कोटी होती. कंपनींच्या एकूण उत्पन्नात २२ टक्क्यांनी वाढ होत ११४७२ कोटींवर उत्पन्न पोहोचले आहे. कंपनीचा करोत्तर नफा (Profit After Tax) ५ टक्क्यांनी वाढत ७७१ कोटींवर पोहोचला आहे.
 
ज्वेलरी व्यवसायाचे एकूण उत्पन्नात १९ टक्क्यांनी इयर ऑन इयर बेसिसवर वाढ झाली असून उत्पन्न ७७१ कोटीवर पोहोचले आहे. ज्वेलरी व्यवसायाच्या करपूर्व नफ्यात १२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.मार्जिनमध्ये १२.१ टक्क्यांनी वाढ झाली असून हे उत्पन्न १०८९ कोटींवर पोहोचले आहे. संपूर्ण वर्षात ज्वेलरी व्यवसायाच्या उत्पन्नात २० टक्क्यांनी वाढ झाली असुन वाढ ३८३५३ कोटींवर पोहोचली आहे. एकूण करपूर्व उत्पन्न ४७२६ कोटींवर पोहोचले आहे.
 
घड्याळाच्या व्यवसायात एकूण उत्पन्न ९४० कोटींवर पोहोचले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत ८ टक्क्यांनी उत्पन्नात वाढ झाली. घरगुती व्यवसायात ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. या व्यवसायाच्या करपूर्व नफा ८० कोटींवर पोहोचला आहे. एकूण उत्पन्नात १८ टक्क्यांनी वाढ होत उत्पन्न ३९०४ कोटीवर पोहोचले आहे. अँनालोग घडाळ्याच्या महसूलात ९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
आयकेअर व्यवसायात एकूण उत्पन्न १६६ कोटींवर आहे कंपनीच्या करपूर्व नफ्यात ८ कोटींपर्यंत वाढला आहे.स संपूर्ण वर्षात कंपनीचे उत्पन्न ५ टक्क्यांनी वाढत ७२४ कोटींवर पोहोचले आहे
 
इमरजिंग व्यवसाय श्रेणीत उत्पन्नात २६ टक्क्यांपर्यंत वाढ होत ९७ कोटींवर या तिमाहीत पोहोचले आहे. या तिमाहीत कंपनीला २२ कोटींचे नुकसान झाले आहे. आज शेअर बाजारात कंपनीचा समभाग १.५ टक्क्यांनी घसरण ३५१४.७५ रुपयांवर पोहोचला होता.