सुनीता केजरीवालांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता; एफआयआर नोंदविण्याची मागणी!

29 May 2024 19:02:22
sunita kejriwal fir plea
 
 
 
नवी दिल्ली :       दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी अडचणीत येण्याची शक्यता आहे. पत्नी सुनीता केजरीवाल यांच्या विरोधाीत एफआयआर नोंदविण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेमार्फत अधिवक्ता वैभव सिंह यांच्या याचिकेत आरोप करण्यात आला आहे की, २८ मार्च २०२४ रोजी जेव्हा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ट्रायल कोर्टात हजर करण्यात आले तेव्हा सुनीता केजरीवाल आणि इतरांनी ट्रायल कोर्टाची कारवाई बेकायदेशीरपणे रेकॉर्ड केली आणि नंतर ती सोशल मीडियावर शेअर केली, असा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, न्यायाधीशांचे बोलणे स्क्रीनवर रेकॉर्ड करत ते नंतर व्हायरल करणे बेकायदेशीर असल्याचे सांगत एफआयआर नोंदविण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, वैभव सिंह यांनी दिल्ली उच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली असून न्यायालयाच्या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कारवाईची मागणी केली आहे. २८ मार्च २०२४ रोजी जेव्हा दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना ट्रायल कोर्टात हजर करण्यात आले तेव्हा सुनीता केजरीवाल आणि इतरांनी बेकायदेशीरपणे ट्रायल कोर्टाच्या कारवाईची नोंद केल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल यांच्याविरोधात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, राजकीय पक्षांनी न्यायपालिकेची प्रतिमा डागाळण्याचा आणि देशातील सामान्य जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न व्हिडिओ रेकॉर्डिंग व्हायरल करण्यात आला आहे. तसेच, न्यायव्यवस्था कोणाच्या निर्देशानुसार काम करत आहे हे सदर व्हायरल रेकॉर्डिगच्या माध्यमातून लोक पाहतील.



Powered By Sangraha 9.0