'एआय'द्वारे जिवंत करणार पुणे अपघाताची घटना!

29 May 2024 14:54:23
 
Pune accident
 
पुणे : पुण्याच्या कल्याणीनगर भागातील पोर्शे कार अपघाताच्या घटनेत दररोज नवनवीन बाबी समोर येत आहेत. या अपघाताच्या सखोल तपासाकरिता अपघाताची घटना एआयद्वारे जिवंत केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यासाठी पोलिसांकडून पुरावे गोळा करण्यात येत आहेत.
 
१९ मे रोजी प्रसिद्ध व्यावसायिक विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाने दारू पिऊन पोर्शे कार चालवत एका दुचाकीला धडक दिली. या अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. याप्रकरणात आरोपी वेदात अग्रवाल, त्याचे वडील विशाल अग्रवाल आणि आजोबा सुरेंद्र अग्रवाल हे सध्या पोलिस कोठडीत आहेत.
 
हे वाचलंत का? -  "सुषमा अंधारे आणि रवींद्र धंगेकर चमकू नेते!" 
 
तसेच ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी आरोपी वेदांतचे ब्लड सँपल बदलल्याप्रकरणी त्यांनादेखील अटक करण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकरणाच्या अधिक तपासासाठी अपघाताची घटना एआयद्वारे जिवंत केली जाणार आहे. यासाठी पोलिसांकडून तांत्रिक पुरावे गोळा करण्यात येत आहे.
 
 
 
Powered By Sangraha 9.0