मुंबई : काही नेते माझ्या मतदारसंघांमध्ये दिवसभर थांबलेत. धर्म आणि समाजात गल्लत कशी होईल अशा प्रकारची भाषणं तिथे करण्यात आली, असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे यांनी शरद पवारांचे नाव न घेता केला आहे.
सुनील तटकरे म्हणाले की, "आता अल्पसंख्यांक समाज अधिक सतर्क करावा लागेल. जाणीवपुर्वक अल्पसंख्यांक समाजात दुरावा निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला. यावर उत्तर शोधावंच लागेल. काही नेते माझ्या मतदारसंघांमध्ये दिवसभर थांबलेत. ३-४ तास त्यांच्या बैठका झाल्या. यामध्ये धर्म आणि समाजात गल्लत कशी होईल अशा प्रकारची भाषणं करण्यात आली," असा गंभीर आरोप त्यांनी पवारांचं नाव न घेता केला आहे.
हे वाचलंत का? - अंजली दमानियांच्या आरोपांवर अजितदादांचं स्पष्टीकरण, म्हणाले, "मी कुणाला..."
ते पुढे म्हणाले की, "नेत्यांच्या उपस्थितीतच मशिदींतून काहीतरी केलं गेलं पाहिजे अशी भाषणं तिथे झालीत. ही बाब अत्यंत दुर्दैवी आहे. राजकारणात अनेक मतमतांतरे होतात, विचारांची फारकत होते. पण यापद्धतीने ज्यावेळी प्रचार केला जातो त्याचा अर्थ निवडणूकीत यश मिळवण्यासाठी वैचारिक पातळी किती खालच्या स्तरावर पोहोचू शकते, याचं उदाहरण अनुभवता येतं," असेही त्यांनी सांगितले.