राष्ट्र उभारणीत महिलांची भूमिका महत्त्वाची!

27 May 2024 16:52:04

Shantakka

जयपूर :
(Women Role in Nation Building)  "राष्ट्र उभारणीत महिलांची भूमिका महत्त्वाची आहे.", असे प्रतिपादन राष्ट्र सेविका समितिच्या मुख्य संचालिका शांताक्काजी यांनी केले. सोमवार, दि. २७ मे रोजी सकाळी जयपूर येथील गोविंद देव जी मंदिराच्या प्रांगणात प्रबोध वर्गातील शिक्षार्थींनी संबोधित केले.

हे वाचलंत का? : दिल्ली विद्यापीठात निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे नारे; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात!

त्या म्हणाल्या, "शाखेच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण विकास होऊन समाजात उज्वल भूमिका बजावण्यासाठी त्या तयार होत असतात. स्त्रिया या समाजाचा प्रमुख भाग आहेत, त्यांच्या विविध भूमिकांद्वारे समाज चालत असतो." मंदिर समितीने यावेळी शांताक्कांचा सत्कार केला. दरम्यान राष्ट्र सेविका समितिच्या क्षेत्र कार्यवाहिका प्रमिला शर्मा, प्रबोध वर्गाच्या वर्गाधिकारी नर्बदा इंदोरिया आणि वर्ग कार्यवाहिका संगीता जांगिड यांसह क्षेत्र व प्रांत कार्यकारिणीचे कार्यकर्ते तसेच १०० हून अधिक सेविका उपस्थित होते.


Rashtra Sevika Samiti
Powered By Sangraha 9.0