दिल्ली विद्यापीठात निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचे नारे; पोलिसांनी दोघांना घेतलं ताब्यात!

    27-May-2024
Total Views |

Delhi University

मुंबई (प्रतिनिधी) :
देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच मतदानाच्या सहाव्या टप्प्याच्या आधी दिल्ली विद्यापीठाच्या (Delhi University) उत्तर कॅम्पसमधील भिंतींवर समाजकंटक आणि अलोकतांत्रिक घटकांनी लोकशाहीविरोधी घोषणा लिहिल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन जणांना ताब्यात घेतले आहे. तरी या प्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने योग्य कारवाईची मागणी केली आहे.

लोकसभा निवडणुकीची घोषणा झाल्यापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने विविध शैक्षणिक संस्थांमध्ये पथनाट्य, पत्रक वाटप, जनजागृती मोहीम, घरोघरी जाणे, चर्चासत्रे, मॅरेथॉनचे आयोजन करून शंभर टक्के मतदान केले जात आहे. यासाठी देशात अनेक प्रयत्न केले जात आहेत, तर दुसरीकडे नकारात्मक शक्ती सातत्याने लोकशाहीचे नुकसान करत आहेत. 'निवडणुकांवर बहिष्कार टाका', 'नक्षलबारी झिंदाबाद', 'मार्क्सवाद झिंदाबाद' अशा प्रकारच्या घोषणा भिंतीवर लिहिण्यात आल्या होत्या.

हे वाचलंत का? : "जेव्हा समाज अधर्माच्या मार्गाकडे वळतो...."; जे नंदकुमार यांचे मोठे विधान

दिल्लीतील तरुण मतदार लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी उत्साही असताना अशा प्रकारच्या अलोकतांत्रिक घोषणा लिहिल्या गेल्या हे अत्यंत दुर्दैवी असल्याचे अभाविपचे म्हणणे आहे. मॉरीस नगर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करून या घटनेत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील अभाविपने केली आहे.

भिंतींवर वादग्रस्त निवडणूक बहिष्काराच्या घोषणा लिहिल्या गेल्यानंतर पोलिसांनी दोन एफआयआर नोंदवले आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गस्तीदरम्यान घोषणा लिहिलेल्या दिसल्या. भगतसिंग छात्र एकता मंच ने भिंतींवर लिहिलेल्या घोषणांची जबाबदारी घेतली आहे. या स्वयंघोषित युवा संघटनेने आपल्या इंस्टाग्राम पेजवर घोषणांची छायाचित्रेही पोस्ट केली होती.

हे वाचलंत का? : 'या' दोन कारणांमुळे भारतातील पत्रकारितेची गळचेपी झाली! नेमकं काय म्हणाले अजय मित्तल?

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे दोन विद्यार्थ्यांची ओळख पटवली, दोघेही दिल्ली विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. दोन्ही विद्यार्थी सीसीटीव्हीमध्ये भिंतीवर देशविरोधी घोषणा लिहिताना दिसत होते. ताब्यात घेतल्यानंतर दोन्ही विद्यार्थिनींची कसून चौकशी केली जात असून, घोषणा लिहिण्यामागील कारणे शोधण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121