शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी उबाठा गटाचे उमेदवार जाहीर!

25 May 2024 17:32:59

Uddhav Thackeray 
 
मुंबई : लवकरच विधानपरिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक होणार आहेत. दरम्यान, उबाठा गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहेत. उबाठा गटाने अनिल परब आणि ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
 
निवडणूक आयोगाकडून पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकांचे नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी येत्या २६ जूनला मतदान होणार आहे. तर १ जुलै रौजी मतमोजणी करण्यात येणार आहे.
 
हे वाचलंत का? -  उद्धव ठाकरेंवर संगतीचा परिणाम! परदेशातील वास्तव्य वाढलं
 
दरम्यान, या पार्श्वभूमीवर उबाठा गटाने आपले उमेदवार जाहीर केले आहे. मुंबई पदवीधर मतदारसंघातून आमदार अनिल परब, तर मुंबई शिक्षक मतदारसंघातून ज. मो. अभ्यंकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अनिल परब हे विधानपरिषदेचे सदस्य असून त्यांची मुदत जुलै महिन्यात संपुष्टात येत आहे. तर, ज. मो. अभ्यंकर हे उबाठा गटाच्या शिक्षक सेनेचे प्रांताध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
 
 
Powered By Sangraha 9.0