पुणे : पुणे अपघात प्रकरणात आरोपी वेदांत अग्रवालचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. कारच्या ड्रायव्हरला धमकावत त्याला दोन दिवस घरात डांबून ठेवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे शनिवारी पुणे पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली आहे.
पुण्याच्या कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपी वेदांत अग्रवालची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तर त्याचे वडील विशाल अग्रवाल यांना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यानंतर आता त्याचे आजोबा सुरेंद्र अग्रवाल यांच्यावरही कारवाई करण्यात आली आहे.
हे वाचलंत का? - उद्धवजी लंडनचे नाले बघायला गेलेत का?
कारच्या ड्रायव्हरने स्वत:वर गुन्हा ओढवून घ्यावा यासाठी सुरेंद्र अग्रवाल यांनी त्याला पैशांचे आमिष दिले होते. तसेच त्याला धमकावत दोन दिवस डांबूनही ठेवले होते. याप्रकरणी सुरेंद्र अग्रवाल यांना अटक करुन कोर्टात हजर करण्यात आले होते. त्यानंतर आता त्यांना २८ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे अग्रवाल कुटुंबाच्या तिन्ही पिढ्यांना हे अपघात प्रकरण चांगलंच भोवलं असल्याचे बोलले जात आहे.