केजरीवालांच्या उमेदवाराला पाठिंबा द्या; रा.स्व.संघाच्या नावे 'फेक' प्रसिद्धीपत्रक!

24 May 2024 14:32:50

RSS Fake Letter

मुंबई (प्रतिनिधी) :
(RSS Fake Letter) देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहत असतानाच मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला खेचण्याचा आणखी एक प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले आहे. दिल्ली निवडणुकीसंदर्भात रा.स्व.संघाच्या नावाखाली मंगळवार, दि. २१ मे रोजी प्रसिद्धीपत्रक जारी करण्यात आले असून त्यात आम आदमी पार्टीचे पश्चिम दिल्ली लोकसभा उमेदवार महाबळ मिश्रा यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. मात्र हे प्रसिद्धीपत्रक फेक असल्याचे सिद्ध झाले आहे. कोणत्याही उमेदवाराच्या बाजूने असे कोणतेही पत्र रा. स्व. संघाने जारी केलेले नाही.

हे वाचलंत का? : कट्टरपंथीयांकडून 'हमारे बारह' चित्रपटाच्या निर्मात्यांना 'सर तन से जुदा'ची धमकी

प्रसिद्धीपत्रकात दिलेल्या माहितीनुसार, महाबल मिश्रा गेली ४२ वर्षे अयोध्येत प्रभू रामाची तन, मन आणि संपत्तीने सेवा करत आहेत. महाबल मिश्रा जी सर्व प्रकारच्या धार्मिक कार्यात आघाडीवर राहतात. त्यांचे सौम्य वर्तन आणि भगवान श्री रामजींच्या भक्तीसाठी त्यांनी अयोध्येत केलेला त्याग अमूल्य आहे. आम्ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सर्व स्वयंसेवकांना आवाहन करतो की, परस्पर सौहार्द आणि विश्वासाचे वातावरण निर्माण करून श्री महाबळ मिश्रा यांना वैयक्तिकरित्या पूर्ण पाठिंबा द्यावा; असे त्यात म्हटले आहे.


RSS Fake Letter

मजकुराच्या शेवटी पूर्व सह सरकार्यवाह डॉ. मनमोहन वैद्य यांचे नाव दिले असून त्यांच्या नावाखाली अ.भा.प्रचार प्रमुख असे दिले आहे. वास्तविक मनमोहन वैद्य हे २०१८ पर्यंत रा.स्व.संघाचे अ.भा.प्रचार प्रमुख होते. २०२१ पासून सुनील आंबेकर यांच्याकडे सध्या ती जबाबदारी आहे.

Powered By Sangraha 9.0