शिवानी वडेट्टीवारांना काँग्रेसची नोटीस!

02 May 2024 18:57:59

Shivani Wadettivar 
 
मुंबई : विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या कन्या आणि युवक काँग्रेसच्या नेत्या शिवानी वडेट्टीवार यांना पक्षाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. पक्षाच्या प्रचारात सहभागी न झाल्याबद्दल ही नोटीस बजावल्याचे सांगण्यात येत आहे. यासोबतच काही पदाधिकाऱ्यांनाही ही नोटीस बजावण्यात आल्याचे बोलले जात आहे.
 
राज्यात निवडणूकांची रणधूमाळी सुरु झाली असून यावेळी महायूती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगणार आहे. अशातच युवक काँग्रेसच्या सरचिटणीस शिवानी वडेट्टीवार यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारात सहभागी न होणे आणि युवक काँग्रेसच्या उपक्रमांमध्ये सहभागी न होण्याचे कारण देत त्यांना ही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे हा शिवानी वडेट्टीवारांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
 
हे वाचलंत का? -  "निवडणूक कशी लढवतात आणि मतमोजणी कशी होते हे राऊतांनी शिकून घ्यावं!"
 
शिवानी वेडट्टीवार या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छूक होत्या. यासाठी त्यांनी काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्लीत काँग्रेसचे अध्यक्ष अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते जयराम रमेश, खासदार मुकुल वासनिक यांच्यासह अनेक नेत्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र, चंद्रपूरमध्ये त्यांना डावलून दिवंगत बाळू धानोरकर यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0