मुंबई (प्रतिनिधी) : मीरा रोड परिसरात (Mira Road News) एका हिंदू महिलेवर धर्मप्रेरित हिंसाचार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मोहसीन शेख असे आरोपीचे नाव असून त्याने तिला इस्लाम स्वीकारण्यास भाग पाडले होते. इस्लाम स्वीकारला नाही याची शिक्षा म्हणून जबरदस्तीने तिचे मुंडन करण्यात आले होते. तिच्याविरुद्ध घडलेल्या घृणास्पद कृत्यांमध्ये मादक पदार्थाचे सेवन, बलात्काराच्या अनेक घटना आणि ब्लॅकमेल अशा अनेक गोष्टींचाही समावेश आहे.
पीडितेने दाखल केलेल्या एफआयआरच्या माहितीनुसार, स्वतः आरोपी त्याच्या कुटुंबातील सदस्य इम्रान बागवान, जाफर शेख, मोबीन शेख, अशफाक शेख आणि शाहजान शेख यांच्या विरोधात शारिरीक अत्याचार केल्याप्रकरणी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२०, ३७६(२)(n), ३१३, ३५४, ३२३, ५०४, ५०६, ३४, ३२८ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
हे वाचलंत का? : विहिंपच्या बजरंग लाल बागडा यांनी घेतली 'पूनम'च्या कुटुंबीयांची भेट
मोहसीन शेख सुरुवातीला २०२३ मध्ये गणेशोत्सवाच्या वेळी पीडितेला भेटला आणि तिच्याशी मैत्री केली होती. पीडितेच्या म्हणण्यानुसार, मोहसीनने गुंगीचे औषध घातलेली बिर्याणी खाऊ घातली होती ज्यामुळे ती बेशुद्ध झाली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याचा आरोप पीडितेने केला आहे. तसेच आपले अश्लिल व्हीडिओ वापरून तिला ब्लॅकमेल करण्याची धमकीसुद्धा आरोपीने दिल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी मोहसीन शेख याला अटक केली असून सदर प्रकरणी तपास सुरू आहे.