विहिंपच्या बजरंग लाल बागडा यांनी घेतली 'पूनम'च्या कुटुंबीयांची भेट
02-May-2024
Total Views |
मुंबई (प्रतिनिधी) : मानखुर्दच्या अण्णा भाऊ साठे नगर येथे लव्ह जिहादची बळी ठरलेल्या पूनम क्षीरसागर (Poonam Kshirsagar VHP) हिच्या कुटुंबियांची विश्व हिंदू परिषदेचे केंद्रीय महामंत्री बजरंग लाल बागडा यांनी नुकतीच भेट घेवून सांत्वन केले. यावेळी पुनमची हत्या करण्याऱ्या आरोपीला जास्तीतजास्त शिक्षा व्हावी यासाठी विश्व हिंदू परिषद प्रयत्न करेल, असे आश्वासन बजरंग लाल यांनी क्षीरसागर कुटुंबीयांना दिले.
पूनमबद्दल चुकीची माहिती पसरवू नये असे आवाहन त्यांनी केले असून अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून समाजाने एकत्र होऊन लढा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. यावेळी त्यांच्यासोबत कोकण प्रांत मंत्री मोहन सालेकर, घाटकोपर विभाग प्रमुख सुशील साहनी, एड. अनूप पाल, शाहीर सुनील व विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, दुर्गा वाहिनी, मातृशक्तिचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते
पूनम क्षीरसागर या मागासवर्गीय तरुणीला अण्णा भाऊ साठेनगर परिसरात राहणाऱ्या आणि टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या निजाम या विवाहित तरुणाने दि. १८ एप्रिल रोजी फूस लावून पळवून नेले होते. त्यानंतर तिची कल्याण येथे निर्घृण हत्या करण्यात आली. शरीराचे तुकडे करून ते सुटकेस मधे भरण्यात आले व ती सुटकेस सुनसान जागी ठेवण्यात आली होती.