"आदूबाळ नाईटलाईफ प्रायव्हेट लिमिटेडच्या जाहिरातीत पॉर्नस्टार!"

02 May 2024 15:55:01
 
Uddhav & aditya Thackeray
 
मुंबई : उद्धव ठाकरेंच्या आणि आदूबाळ नाईटलाईफ प्रायव्हेट लिमिटेडच्या जाहिरातीतील पात्र हे एक पॉर्नस्टार आहे, असा गंभीर आरोप भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रात पब, पार्टी आणि पॉर्न अशा नवीन संस्कृती आणण्याचा प्रयत्न करत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. चित्रा वाघ यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेत उबाठा गटाच्या एका जाहिरातीवर आक्षेप घेतला आहे.
 
चित्रा वाघ म्हणाल्या की, "महाराष्ट्रात उद्धव ठाकरेंनी पब, पार्टी आणि पॉर्न अशा नवीन संस्कृती आणण्याचा किळसवाणा प्रकार केलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या आणि आदूबाळ नाईटलाईफ प्रायव्हेट लिमिटेडच्या जाहिरातीतील पात्र हे एक पॉर्नस्टार आहे. हा पॉर्नस्टारच जाहिरातीत महिलांवरील अत्याचार कधी थांबणार असं विचारत आहे. या जाहिरातीत बापाच्या भूमिकेत असलेला हाच पॉर्नस्टार लहान वयाच्या मुलींसोबत अश्लील चित्रीकरण करतो. त्याचे ‘उल्लू’ ॲपवर मुलींसोबत घाणेरडे कृत्य करतानाचे व्हिडीओ क्लिप्स आहेत," असा गंभीर आरोप त्यांनी केला.
 
हे वाचलंत का? -  "तुम्ही मुख्यमंत्री झाले तेव्हा कर्नाटक..."; फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल
 
"उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये कसली संस्कृती आणायचा प्रयत्न करत आहेत? असे बाप जाहिरातीमध्ये वापरून आपण बाप असल्याचं तुम्ही महाराष्ट्राला दाखवणार आहात का? ही जाहिरात तयार करणारी कंपनी कोणती, ती कोणाची? त्याचा आणि या पॉर्नस्टारचा काय संबंध आहे? तसेच या जाहिरात कंपनीचे आणि उद्धव ठाकरेंचे काय संबंध आहेत? याचं उत्तर उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्रातील जनतेला दिलं पाहिजे," असे त्या म्हणाल्या.
 
तसेच केंद्र सरकारने सर्व अश्लील ॲप्सवर बंदी आणावी म्हणजे उद्धव ठाकरेंना असले पॉर्नस्टार पुन्हा सापडणार नाहीत, अशी मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, त्यांनी उबाठा गटाच्या जाहिरातील पात्राचे फोटोही दाखवले. त्यामुळे यावरून राजकारण तापण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0