उमेदवारी अर्ज भरताना पंतप्रधानांसोबत बसलेली त्यांची ही विश्वासू व्यक्ती आहे तरी कोण?

    16-May-2024
Total Views |

पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड

मुंबई (प्रतिनिधी) :
पंतप्रधान नरेंद्र मोदींना (Narendra Modi Varanasi) वाराणसी लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज मंगळवार, दि. १४ मे रोजी दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांसह एनडीएचे विविध नेते उपस्थित होते. पंतप्रधान मोदींच्या बाजूला आणखी एक व्यक्ती बसली होती जी अर्ज भरताना शेवटपर्यंत मोदींसोबत होती. ती व्यक्ती कोण होती? हा प्रश्न निश्चितच प्रत्येकाला पडला असेल.

हे वाचलंत का? : हे तुम्हाला माहितीये का? एका मृत्युमुळे केरळच्या २६४८ मंदिरांमध्ये 'या' फुलावर बंदी आणली आहे

हे आहेत पंडित गणेश्वर शास्त्री द्रविड जी, जे पंतप्रधान मोदींचे प्रस्तावक म्हणून आहेत. ते ज्योतिषशास्त्राचे मोठे विद्वान आहेत. अनवाणी राहून यम-नियमाचे ते पालन करतात. आचार्य जी एखाद्या ऋषीमुनींप्रमाणेच जीवन जगतात. कपड्यांच्या बाबतीत म्हणाल तर ते केवळ धोतर नेसतात. पंतप्रधान मोदींचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शुभ मुहुर्त त्यांनी काढला होता. इतकंत नव्हे तर अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या भूमीपूजनासाठी शुभ मुहूर्तही त्यांनी सुचवला होता.

ज्योतिषांच्या जगात सर्वात विश्वासार्ह नाव असलेले शास्त्री जी दक्षिण भारतातून आले आहेत आणि त्यांनी आता काशीला त्यांची आध्यात्मिक नगरी बनवले आहे. त्यांना यापूर्वी पद्मभूषण देऊनही सन्मानित करण्यात आले आहे. सोबतच त्यांना जगद्गुरू रामानंदाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आचार्य गणेश्वर शास्त्री सध्या एक शाळा चालवतात, आणि येथे ते मुलांना आचार्य बनण्यास आणि विधी करण्यास शिकवतात. आज संपूर्ण जग त्यांना ओळखू लागले आहे.