मोदींच्या रोड शोमुळे वाहतूकीत बदल! 'या' पर्यायी मार्गांचा वापर करता येणार

    15-May-2024
Total Views |
 
Narendra Modi
 
मुंबई : गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो असल्यामुळे वाहतूकीमध्ये बदल करण्यात आला आहे. दुपारी २ ते रात्री १० वाजेपर्यंत हा बदल करण्यात आला आहे. यादरम्यान अनेक रस्ते बंद राहणार असून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्यास सांगण्यात आले आहे.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रोड शो दरम्यान, लाल बहादूर शास्त्री मार्ग(एलबीएस रोड) गांधी नगर ते नऊपाडा जंक्शन आणि माहुल-घाटकोपर रोड : मेघराज जंक्शन ते आरबी कदम जंक्शन बंद राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे यावेळी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
हे वाचलंत का? -  "एकनाथ शिंदे ७-८ तासांसाठी मुख्यमंत्री झाले होते, पण ठाकरेंनी..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
 
यादरम्यान, नागरिकांना पुर्व दृतगती महामार्ग, पश्चिम दृतगती महामार्ग, अंधेरी-कुर्ला मार्ग, साकी विहार मार्ग, एमआयडीसी सेंट्रल रोड, सांताक्रूझ चेंबूर लिंक रोड (SCLR), सायन वांद्रे लिंक रोड आणि जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोड (JVLR) या मार्गांचा वापर करता येईल.
 
लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील सहा मतदारसंघात निवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आहेत. गुरुवारी त्यांचा रोड शो होणार आहे. तसेच त्यानंतर शिवाजी पार्कवर राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची एकत्र सभा होणार आहे.