शेअर बाजार अपडेट: बाजारात सुरूवात चढत्या आलेखाने सेन्सेक्स ६५.७१ अंशाने वाढत ७२८५०.५४ पातळीवर पोहोचला निफ्टी ५० निर्देशांक ४४.१० अंशाने वाढत २२१४८.१५ पातळीवर

मिडिया, ऑटो, मेटल समभागात वाढ तर पीएसयु बँक, प्रायव्हेट बँक, एफएमसीजी समभागात घसरण

    14-May-2024
Total Views |

Stock Market
 
 
मुंबई: आज सकाळच्या सत्रात इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात तुलनात्मकदृष्ट्या वाढ झालेली आहे. बाजारातील 'नैसर्गिक रिबाऊंड' फेज परतल्याने बाजाराचा चढता आलेख सुरू झाला आहे. मुख्यतः ब्लू चिप्स कंपन्यांच्या समभागात वाढ होताना मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याने बाजारात रॅली अपेक्षित आहे. भारतातील निवडणुकीतील काळात अपेक्षित निकाल येईल का याची सावधगिरी बाळगली जात असतानाच मात्र काल अमित शहा यांच्या वक्तव्याने बाजारात 'जान' आल्याचे चित्र काल पहायला मिळाले आहे. अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याची शक्यता नसल्याने परदेशी गुंतवणूकदारांनी आपले लक्ष पीपीआय डेटाकडे केंद्रित केले आहे.
 
सकाळच्या सत्रात सकाळी ११ वाजेपर्यंत सेन्सेक्स ६५.७१ अंशाने वाढत ७२८५०.५४ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी ५० निर्देशांक ४४.१० अंशाने वाढत २२१४८.१५ पातळीवर पोहोचला आहे.सेन्सेक्स बँक निर्देशांकात ७०.२२ अंशाने घसरण होत बँक निर्देशांक ५४४३७.२८ पातळीवर पोहोचला आहे तर निफ्टी बँक निर्देशांक २९.८० अंशाने वाढत ४७७८३.९० पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसईतील मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.३९ व १.०४ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.१५ व ०.८२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
आज मुख्यतः बाजारातील निफ्टी क्षेत्रीय निर्देशांकात संमिश्र प्रतिसाद कायम राहिला आहे. सर्वाधिक वाढ निफ्टी मेटल (१.४०%) ऑटो (१.२५%) वाढ झाली आहे तर याशिवाय मिडिया (१.१९%), पीएसयु बँक (०.४९%) समभागात झाली असुन सर्वाधिक नुकसान मिड स्मॉल हेल्थकेअर (०.५३%) प्रायव्हेट बँक (०.०२%) एफएमसीजी (०.३३%) आयटी (०.३७%) फायनांशियल सर्विसेस (०.०९%) या समभागात घसरण झाली आहे.
 
तज्ञांच्या मते बाजारात सकारात्मकता दिसून येत असताना मात्र गुंतवणूकदारांना मात्र सावधतेचा इशारा तज्ञांनी दिला आहे. चीनमध्ये आर्थिक परिस्थिती सुधारत असताना गुंतवणूकीचा मोठा वाटा परदेशी गुंतवणूकदार चीन हाँगकाँग या देशात नेण्याची शक्यता असताना मात्र भारतातील किरकोळ महागाई दर कमी झाले असल्याने बाजारात पुन्हा एकदा 'अंडरकरंट' बघायला मिळेल का यावर गुंतवणूकीचे भविष्य ठरण्याची शक्यता आहे. अमेरिकन बाजारातील किरकोळ महागाई दराचे आकडेवारी येण्याचं शक्यता आहे. गेल्या काही दिवसांत अमेरिकन बाजारात रॅली दिसत असल्याने भारत देशांतर्गत व परदेशी स्थितीत गुंतवणूकदार कसा प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
 
सकाळच्या सत्रात बीएसईत एम अँड एम, जेएसडब्लू स्टील, एनटीपीसी, टायटन कंपनी, पॉवर ग्रीड, मारूती सुझुकी, इंडसइंड बँक, सनफार्मा, रिलायन्स, लार्सन, टाटा स्टील, एसबीआय, विप्रो, अल्ट्राटेक सिमेंट, कोटक महिंद्रा बँक, एचयुएल, टाटा मोटर्स, एचसीएलटेक, बजाज फिनसर्व्ह, भारती एअरटेल या समभागात वाढ झाली आहे तर नेस्ले, एक्सिस बँक, टीसीएस, बजाज फायनान्स, आयसीआयसीआय बँक, टेक महिंद्रा, एशियन पेंटस, इन्फोसिस,आयटीसी, बजाज फिनसर्व्ह या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत आज एम अँड एम, हिरो मोटोकॉर्प, अदानी एंटरप्राईज, हिंदाल्को, जेएसडब्लू स्टील, हिंदाल्को, जेएसडब्लू स्टील, श्रीराम फायनान्स, एनटीपीसी, टायटन कंपनी, एचडीएफसी बँक, मारूती सुझुकी, कोल इंडिया, पॉवर ग्रीड, सनफार्मा, लार्सन, टाटा स्टील, इंडसइंड बँक, रिलायन्स, विप्रो, एसबीआय, ओएनजीसी, कोटक महिंद्रा, आयशर मोटर्स, डिवीज,अदानी पोर्टस, टाटा मोटर्स, भारती एअरटेल, एचयुएल, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, बजाज ऑटो या समभागात घसरण झाली आहे.
 
आजच्या बाजारातील निरिक्षणासाठी महत्वाचे समभाग कुठले ?
 
श्रीराम फायनान्स, डीएलएफ, भारती एअरटेल, एचडीएफसी,झोमॅटो