‘श्रीकांत’ चित्रपटाने चार दिवसांत कमावले ‘इतके’ कोटी

    14-May-2024
Total Views |

srikanth
 
 
 
मुंबई : भारतातील पहिले अंध उद्योगपती श्रीकांत बोल्ला यांच्या जीवनाची प्रेरणादायी कथा सांगणारा ‘श्रीकांत’ (Srikanth) या चित्रपट १० मे रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव याने श्रीकांत यांची भूमिका साकारली आहे. सामान्य माणसांना एक अनमोल सल्ला देणारा हा चित्रपट प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळवत असून बॉक्स ऑफिसवरही उत्तम कमाई करत आहे.
 
सॅकनिल्कच्या माहितीनुसार, श्रीकांत या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी २.२५ कोटी, दुसऱ्या दिवशी ४.२ कोटी, तिसऱ्या दिवशी ५.२५ कोटी, चौथ्या दिवसी १.६५ कोटी कमवत आत्तापर्यंत एकूण १३.३५ कोटी चार दिवसांत कमावले आहे.
‘श्रीकांत’ हे जन्मत: नेत्रहीन असून जिद्दीच्या जोरावर त्यांनी मोठी स्वप्न पाहिली आणि ती पुरण केली. त्यांनी विज्ञान शाखेत शिक्षण घेत उद्योगपती आणि बोलंट इंडस्ट्रीजचे संस्थापक असा प्रवास पुर्ण केला. तुषार हिरानंदानी दिग्दर्शित या चित्रपटात राजकुमार रावसह ज्योतिका, आलिया एफ आणि शरद केळकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.