शेअर बाजार अपडेट: आठवड्याची सुरूवात खळबळजनक वीआयएक्स १८ टक्के पार सेन्सेक्स ३३५.६५ अंशाने व निफ्टी ९३.७० अंशाने घसरला

फार्मा हेल्थकेअर समभागात वाढ तर ऑटो, गॅस, रिअल्टी समभागात नुकसान

    13-May-2024
Total Views |

Stock Market
 
 
मुंबई:आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात मोठी घसरण झाली. विशेषतः VIX Volatility निर्देशांकात सकाळी १८ टक्क्यांची मर्यादा ओलांडल्याने सकाळपासून शेअर बाजारात निराशाजनक चित्र निर्माण झाले आहे. निवडणुकीच्या तोंडावर आठवड्याची सुरुवात निराशाजनक झाली असली तरी बाजारातील गुंतवणूकदार बाजार वाढण्याची आस वाढवून बसले आहेत. सेन्सेक्स दुपारी १२ वाजेपर्यंत ३३५.६५ अंशाने घसरत ७२२८९.३७ पातळीवर पोहोचले असून निफ्टी ५० निर्देशांक ९३.७० अंशाने घसरत २१९६१.५० पातळीवर पोहोचला आहे.
 
बीएसई बँक निर्देशांक २५४३.९२ अंशाने घसरत ५३९०९.४३ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी बँक निर्देशांक १५३.४० अंशाने घटत ४७२६७.७० पातळीवर पोहोचला आहे. बीएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये ०.९५ व ०.८४ टक्क्यांनी घट झाली आहे तर एनएसई मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे १.०४ व १.२० टक्क्यांनी घट झाली आहे.
 
एनएसईत क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये केवळ फार्मा (०.८६ %) व हेल्थकेअर (०.६०%) निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रीय निर्देशांकात घसरण झाली आहे. सर्वाधिक घसरण ऑटो (२.३४ %) तेल गॅस (१.२२%) रिअल्टी (०.५२%) समभागात घसरण झाली आहे.
 
बाजारातील आज VIX निर्देशांकात मोठी वाढ झाल्याने बाजारात खळबळ उडाली आहे. गेल्या काही दिवसांत VIX निर्देशांकात मोठी वाढ होत असल्याने परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार व देशांतर्गत गुंतवणूकदारांच्या गुंतवणूकीत अस्थिरतेचे चित्र पहायला मिळाले आहेत.
 
अमेरिकन बाजारातील कनज्यूमर प्राईज इंडेक्स व कनज्यूमर प्राईज इन्फ्लेशन इंडेक्स याकडे परदेशी गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रित केल्यामुळे गेल्या आठवड्यात परदेशी गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात आपली गुंतवणूक काढून घेतली होती.दुसरीकडे देशांतर्गत गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक बाजारातील वाढवली असली तरी भारतीय निवडणूका व तिमाहीचे निकाल यामुळे बाजारात अनिश्चितता कायम आहे.
 
आज पुन्हा एकदा VIX सकाळी १७ ते १८ टक्क्यांपर्यंत वाढल्याने बाजारातील अनेक कंपन्यांच्या समभागात मोठे नुकसान झाले आहे. आजच्या बाजारातील VIX Volatility Index निर्देशांकात वाढलेल्या गतीवर भाष्य करताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे चीफ मार्केटिंग स्ट्रेटेजिस्ट आनंद जेम्स म्हणाले, 'VIX च्या वर्तनात आता २०१९ च्या निवडणूक निकालांच्या घोषणेच्या काही काळापूर्वीच्या कालावधीशी बरेच साम्य आहे. त्यानंतर देखील, मार्चमध्ये बाजार शिखरांवर आले होते आणि VIX ने २८.६ पर्यंत मजल मारली होती. मुख्य फरक हा आहे की याआधी, VIX मध्ये होता. मागील ६ महिन्यांत २०-१४ श्रेणी, वाढीव कालावधीसाठी वाजवीपणे उच्च असण्याची शक्यता दर्शविते, VIX ची विक्रमी नीचांकी पातळी आता २० वर आली आहे VIX मध्ये वरच्या बाजूस अधिक जागा दर्शविते आणि त्याद्वारे अस्थिरता, VIX च्या बदलाच्या दरातील अचानक वाढ, कदाचित निवडणुकीच्या निकालापूर्वीच थंड होऊ शकते.'
 
आज सकाळच्या सत्रात बीएसईत एशियन पेंटस, एचडीएफसी बँक, लार्सन, टीसीएस, सनफार्मा, बजाज फायनान्स, एचयुएल, अल्ट्राटेक सिमेंट, बजाज फिनसर्व्ह या समभागात गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे तर टाटा मोटर्स, इंडसइंड बँक, एक्सिस बँक, मारूती सुझुकी, भारती एअरटेल, एनटीपीसी, रिलायन्स, एम अँड एम, कोटक महिंद्रा, इन्फोसिस, जेएसडब्लू स्टील, नेस्ले, विप्रो, टेक महिंद्रा, एचसीएलटेक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, आयटीसी, पॉवर ग्रीड या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.
 
एनएसईत सिप्ला, एशियन पेंटस, डिवीज, एचडीएफसी बँक, ब्रिटानिया, अदानी पोर्टस, एचडीएफसी बँक, लार्सन, टीसीएस, सनफार्मा, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह या समभागात गुंतवणूकदारांना फायदा झाला आहे तर टाटा मोटर्स, हिरो मोटोकॉर्प, बीपीसीएल, इंडसइंड बँक, श्रीराम फायनान्स, ओएनजीसी, टायटन कंपनी, एनटीपीसी, एसबीआय, एक्सिस बँक, मारुती सुझुकी, रिलायन्स,टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, भारती एअरटेल, नेस्ले एम अँड एम, जेएसडब्लू स्टील, इन्फोसिस, विप्रो, कोटक , डॉ रेड्डीज, बजाज ऑटो, हिंदाल्को, टेक महिंद्रा, आयशर मोटर्स, एचसीएलटेक, टाटा स्टील, आयसीआयसीआय बँक, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, पॉवर ग्रीड, अल्ट्राटेक सिमेंट, ग्रासीम या समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे.