"पाकिस्तानकडे अणुबॉम्ब त्याला आदर द्या" - काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर

    10-May-2024
Total Views |
 Mani shankar aiyar
 
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते मणिशंकर अय्यर यांचे एक वादग्रस्त विधान समोर आले आहे. एका मुलाखतीत त्यांनी पाकिस्तानला समृद्ध देश म्हटले आहे. त्यासोबतचं भारताने पाकिस्तानशी चांगला संवाद ठेवला पाहिजे, ना की बंदूकीचा धाक दाखवला आहे, असे वक्तव्य त्यांनी केले. मणिशंकर अय्यर त्यांनी लिहिलेल्या नवीन पुस्तकाच्या प्रसिद्धीसाठी मुलाखती देत आहेत. याचं दरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले.
 
मणिशंकर अय्यर यांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये ते म्हणाले की, “पाकिस्तान हा सार्वभौम देश आहे, त्यांचाही आदर केला पाहिजे. तिथे कोणी वेडा सत्तेवर आला तर आपल्या देशाचे काय होईल? त्यांच्याकडे अणुबॉम्ब आहेत. आमच्याकडेही आहे, पण लाहोर स्टेशनवर काही वेड्या माणसाने बॉम्ब सोडला तर त्याची रेडिओ ॲक्टिव्हिटी आठ सेकंदात अमृतसरला पोहोचेल. जर तुम्ही त्याला ते वापरण्यापासून थांबवले, त्याच्याशी बोला, त्याला आदर दिला, तरच तो त्याच्या बॉम्बचा विचार करणार नाही, परंतु तुम्ही त्याला नाकारले तर काय होईल." असे वक्तव्य केले.
 
अय्यर पुढे म्हणाले, “जर आपल्याला जगाचे विश्वगुरू बनायचे असेल, तर हे दाखवून देणे गरजेचे आहे की, पाकिस्तानशी आपली समस्या कितीही वाईट असली तरी त्यावर तोडगा काढण्यासाठी आपण प्रयत्नशील आहोत. गेल्या दहा वर्षांपासून सगळी मेहनत थांबली आहे. मुस्कटदाबी धोरण दाखवणाऱ्या भारताने हे विसरू नये की पाकिस्तानकडेही कहूता (रावळपिंडी) मसल (अणुबॉम्ब) आहे.