जपानमध्ये ‘निकाह जिहाद’

    10-May-2024
Total Views |
mosques on the rise in Japan amid

भारतातच नाही, तर २०१० ते २०२१ या काळात जपानमध्येही मुस्लिमांची लोकसंख्या ११० पटीने वाढली. त्यांना आता कब्रस्थान अपुरी पडत आहेत. त्यामुळे मृतदेह दफन करण्याऐवजी चक्क जाळावा लागतो. नवीन दफनभूमीसाठी परवानगी द्या, अशी मागणी तेथील मुस्लीम करतात. मात्र, भूजल प्रदूषण होईल, म्हणून एकही नवीन दफनभूमी नको, या भूमिकेवर जपानी नागरिक ठाम आहेत. त्यांना वाटते की, जपानी मुलींशी निकाह करून जपानमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या वाढली. म्हणजे आता लोकसंख्यावाढीसाठी निकाह?

‘लव्ह जिहाद’, ‘ड्रग्ज जिहाद’, ‘लॅण्ड जिहाद’ अगदी कालपरवा आपल्या देशात मुस्लीम नेत्याने ‘व्होट जिहाद करा’ असे हेसुद्धा म्हटले. पण, निकाह करून लोकसंख्या वाढवणे हे जपानमध्ये झाले असेल का? २०१० साली इथे मुस्लिमांची लोकसंख्या एक लाख होती, ती २०२१ साली २ लाख ३० हजार झाली. जपानमध्ये मुस्लीम पुरूषांपेक्षा मुस्लीम महिलांचीच संख्या जास्त आहे. या महिलामंध्ये मुळच्या शिंतो किंवा बौद्ध धर्माच्या महिला जास्त आहेत. त्यांनी मुस्लिमांशी निकाह केल्यानंतर धर्मांतरण केले होते. त्यामुळे जपानमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या वाढली. जपानी मुलींशी निकाह करणारे हे मुस्लीम मूळचे इंडोनेशिया, मलेशिया पाकिस्तान किंवा बांगलादेशचे. ते जपानमध्ये शिकण्यासाठी किंवा नोकरीसाठी आलेले. त्यांनी जपानी मुलींशी ओळख वाढवत, प्रेमसंबंध निर्माण केले. मुली प्रेमाच्या जाळ्यात अडकलेल्या. त्यांनी निकाह केला आणि निकाह मुस्लीम कायद्यानुसार वैध व्हावा, म्हणून त्यांनी धर्मांतरण केले. याच काळात जपानमध्ये मशिदींची संख्याही वाढली. १९९९ साली जपानमध्ये १५ मशिदी होत्या त्यांची संख्या २०२१ साली ११३ झाली. याच काळात ५० हजार जपानी नागरिकांनी मुस्लीम धर्म स्वीकारला.

या सगळ्याला जपान सरकारचे धोरणही तितकेच कारणीभूत. ८०च्या दशकात जपान सरकारने इंडोनेशिया, मलेशिया, पाकिस्तान, इराण आणि बांगलादेश या देशांशी करार केला. त्यानुसार या देशातील लोकांना जपानमध्ये येण्यासाठी व्हिसामध्ये सूट होती. त्यामुळे या देशातील नागरिक जपानमध्ये फिरण्यासाठी आणि नोकरीकसाठी येऊ लागले. दुसरीकडे जगभरातले मुस्लीम पर्यटक देशात यावेत म्हणून जपानने प्रयत्न सुरू केले. मुस्लीम पर्यटकांना आकृष्ट करण्यासाठी ‘हलाल’ वस्तू असलेले ‘हलाल बाझार’, ‘हलाल हॉटेल’ इतकेच काय, ‘हलाल यात्रा’चेही आयोजन जपान करू लागला. अगदी जपानने मुस्लीमफे्ंरडली क्योटो नावाची वेबसाईटही सुरू केली. मात्र, याचकाळात जगभरात कट्टरपंथी संघटनांच्या क्रूर हिंसात्मक कारवाया सुरू झाल्या. जपानमध्ये या जागतिक घटनांचे पडसाद उमटलेे. जपाननेही पुढे इराण, पाकिस्तान, बांगलादेशच्या नागरिकांना व्हिसामध्ये असलेली सूट बंद केली. पण, तोपर्यंत मूळच्या शिंतो किंवा बौद्ध धर्मातील मुलींशी निकाह करण्याचा कार्यक्रम जपानमध्ये सुरू झाला होता. एका दशकात जपानमध्ये मुस्लिमांची लोकसंख्या ११० पट झाली.

लोकसंख्या वाढली तरी जपानमध्ये कब्रस्थानं वाढली नाहीत. जपानमध्ये प्रमुख मोठी अशी सात कब्रस्तानं आहेत. शिवाय छोटीमोठी कब्रस्थानं आहेत. पण, वाढत्या लोकसंख्येला ही कब्रस्थानं पुरत नाहीत. माणूस मेला की त्याचे दफन करायचे, हा इस्लामिक संस्कार. पण, कब्रस्थानाची वानवा असल्याने इथे मुस्लिमांनाही हिंदू, बौद्ध किंवा शिंतो धर्मपरंपरेप्रमाणे मृतदेहाला अग्नीच्या स्वाहा करावे लागते. या विरोधात जपानी मुस्लीम ‘बेप्पू मुस्लीम असोसिएशन’ या मुस्लीम संघटनेच्या नेतृत्वाखाली एकत्र आले. या असोसिएशनचा प्रमुख ताहिर खान. हा मूळचा पाकिस्तानचा. जपानमध्ये शिकायला आला होता. पण, शिकून जपानमध्ये नोकरीला लागला. स्थिरस्थावर झाल्यावर त्याने जपानी लोकांकडून हक्क मागण्यासाठी संघटना सुरू केली. जपानमध्ये प्रत्येक जिल्ह्यात एक तरी कब्रस्थान द्या अशी मागणी ही संघटना करत आहे. पण, जपानी नागरिक ही मागणी मान्य करत नाहीत. भूजल प्रदूषणाचे दाखले देत ते मुस्लिमांना म्हणतात की ”आमच्या देशात राहायचे, तर आमच्या देशाचे रितीरिवाज पाळा. कायदे पाळा.” दुसरीकडे जपानमध्ये केवळ जपानचे मूळ धर्म आणि मूळ संस्कृतीच मुख्य आहे, असे मानणार्‍यांच्या लोकसंख्येमध्ये वाढ होत आहे. जपानमध्ये वाढणार्‍या मुस्लीम लोकसंख्येला आळा घालावा, असे या जपानी नागरीकांचे मत. त्यामुळेे येणार्‍या काळात जपानमध्ये कब्रस्थान वाढतील की जपानी मुलींचे निकाह वाढतील, हे चित्र स्पष्ट आहे.

 
योगिता साळवी