तामिळनाडूत निवडणुकीआधी आयटीकडून छापेमारी; इतक्या कोटींची रक्कम जप्त!

09 Apr 2024 18:14:23
unaccounted-cash-seized-from-pollachi-hatchery


नवी दिल्ली : 
     लोकसभा निवडणूक २०२४ आधीच तामिळनाडूतील कोईम्बतूरमधून कोट्यवधी रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे. आयकर विभागाने एका पोल्ट्री फार्मवर छापा टाकून ही रक्कम जप्त केल्याचे सूत्रांकडून मिळालेल्या वृत्तातून समोर आले आहे. दरम्यान, याआधी आयकर विभागाकडून ३२ कोटी रुपये जप्त केले आहे.

तामिळनाडूमधील पोल्ट्री फार्मवर तब्बल १५ तास चाललेल्या छापेमारीत आयकर विभागाला ३२ कोटी रुपयांची रक्कम मिळाली आहे. सदर प्रकरणी आयटीकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जप्त करण्यात आलेली रक्कम मतदारांना वाटण्यासाठी ठेवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.


एनआयएच्या तपासानंतर बंगाल पोलिसांकडून अधिकाऱ्यांवर एफआयआर दाखल!


आयकर विभागाकडून छापा टाकल्यानंतर बँक कर्मचाऱ्यांनाही त्या ठिकाणी बोलविण्यात आले. सुमारे १५ तास चाललेल्या या छाप्यात ३२ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आयटी अधिकाऱ्यांनी पोल्लाची येथील वेंकटेश कॉलनीत छापा टाकला.

जप्त करण्यात आलेले पैसे मतदारांमध्ये वाटण्यासाठी जमा केले असावेत, असा अंदाज आहे. आता आयटी विभागासह निवडणूक आयोगाचे अधिकारीही या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ही फार्म पोल्लाची येथील अरुण मुरुगन आणि श्रवण मुरुगन चालवत असल्याचे आतापर्यंत समोर आले आहे. राज्यभरात त्याच्या इतर अनेक शाखा आहेत.



Powered By Sangraha 9.0