नवी दिल्ली : 'पश्चिम बंगालमध्ये एनआरसी लागू केल्यास संपूर्ण भारत पेटेल', अशी धमकी 'लष्कर'च्या नावाने केंद्रीय मंत्र्यांना मिळाली आहे. बंगालमध्ये एनआरसी लागू झाली आणि त्यामुळे मुस्लिमांवर अत्याचार झाल्यास संपूर्ण भारत पेटेल, एनआरसीच्या मुद्द्यावर अशा आशयाच्या धमकीचे पत्र केंद्रीय मंत्री शंतनू ठाकूर यांना पाठवले आहे.
दरम्यान, पश्चिम बंगालसह भारत पेटेल, तुमचे टागोर हाऊस उडविले जाईल. आम्ही लष्कर-ए-तोयबाचे सदस्य आहोत, असे पत्रात म्हटले आहे. दि. ०८ एप्रिल रोजी हे पत्र नजरुल इस्लाम साहिब अली आणि फैज अली नावाच्या व्यक्तींनी पोस्टाद्वारे पाठवले आहे. पत्राआधी केंद्रीय मंत्र्यांनी राज्यातील सत्ताधारी पक्षावरही तिखट शब्दांत हल्ला चढवला.
हे वाचलंत का? - विरोधकांकडून फक्त कुटुंबाचा विकास!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, लष्कराच्या नावाने शंतनू ठाकूर यांना पाठवलेले पत्र बंगाली भाषेत लिहिलेले आहे. पत्रात लिहिले आहे, “शंतनु बाबू मला आशा आहे की तुम्ही बरे आहात. मी तुम्हाला सांगतो की, जर पश्चिम बंगालमध्ये एनआरसी झाली आणि एनआरसीमुळे मुस्लिमांवर अत्याचार झाले तर पश्चिम बंगाल आणि संपूर्ण भारत पेटेल. तुमचे टागोर हाउस उडवले जाईल. ठाकूरबारीत कोणत्याही व्यक्तीला राहू दिले जाणार नाही. तुम्ही लष्कर-ए-तैयबाचे नाव ऐकले आहे का? आम्ही लष्कर-ए-तैयबाचे सदस्य आहोत.