महाराष्ट्र : पंतप्रधान नरेंद्र मोदींची चंद्रपुरात जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. विरोधकांनी फक्त परिवाचा विकास केला असून आमचे सरकार सर्वसामान्याचे सरकार आहे, असा हल्लाबोल पंतप्रधानांनी मोदींनी विरोधकांवर केला आहे. विरोधकांनी मुंबई मेट्रोचे काम थांबविले, समृध्दी महामार्गाला विरोध केला, काँग्रेस पक्ष हा समस्यांची जननी आहे, असा टोला मोदींनी काँग्रेसला लगावला आहे.
दरम्यान, चंद्रपुरात भाजपकडून सुधीर मुनगंटीवार यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आले आहे. लोकसभा प्रचारार्थ पंतप्रधान मोदींनी चंद्रपूर येथे जनतेला संबोधित केले. राममंदिर निर्माणासाठी देखील विरोधकांनी अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. काँग्रेस पक्षाने विकासाला सतत विरोध केला असून विरोधकांना देश लूटण्यासाठी केंद्रात सत्ता हवी आहे, असा घणाघात पंतप्रधानांनी काँग्रेसवर केला आहे.
चंद्रपुरातील जाहीर सभेला संबोधित करताना राज्यातील जनतेला गुढी पाडवा, नूतनवर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. इंडिया आघाडी दक्षिण भारताला वेगळं करण्याचा कट रचत आहे. काँग्रेस पक्षाने आगामी निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिध्द केला आहे. काँग्रेसच्या जाहीरनाम्याची भाषा ही मुस्लीम लीगची भाषा आहे, अशा शब्दांत मोदींनी समाचार घेतला. काँग्रेस पक्षाने काश्मीरच्या समस्या निर्माण केल्या आहेत. तसेच, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी काँग्रेला विरोध केला होता, असे म्हणत अप्रत्यक्ष टोला उबाठा गटाला लगावला आहे.
काँग्रेस सरकारच्या काळात देशात दहशतवादी हल्ले झाले. काँग्रेससोबत असलेली नकली शिवसेना असून बाळासाहेबांचे खरे विचार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे नेत आहेत. बाळासाहेबांनी ज्यांना विरोध केला त्यांच्यासोबत ठाकरे गेले असेही मोदी यावेळी म्हणाले. सरकारने देशातील मोठ-मोठ्या समस्येवर तोडगा काढले असून आमचं सरकार वंचित, गरीब, आदिवासी कुटुंबीयांच्या पाठीशी आहे, असेही पंतप्रधान मोदींनी सांगितले.