१००% मतदानासाठी अभाविप विशेष मोहीम राबविणार!

06 Apr 2024 19:28:14
ABVP election voting


मुंबई : 
    अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, मुंबई महानगरच्या समीक्षा योजना बैठकीला शनिवार, दि. ६ एप्रिल रोजी सुरुवात झाली. यशवंत भवन, परळ येथे ही दोन दिवसीय बैठक होत असून बैठकीचे उद्घाटन अभाविपचे राष्ट्रीय संघटनमंत्री आशिष चौहान, महानगर मंत्री निधी गाला, महानगर संघटनमंत्री ईशान गणपुले यांच्या उपस्थितीत झाले.


हे वाचलंत का? -  सांगलीच्या बदल्यात 'उबाठा'कडून काँग्रेसकडे १०० कोटींची मागणी!


अभाविप दरवर्षी पूर्ण वर्षभरात केलेले विविध कार्यक्रम, अभियान, आंदोलन, संघटनात्मक स्थिती याचा आढावा घेऊन सखोल चिंतन करत असते व मागील शैक्षिणक सत्रातील अनुभवाच्या जोरावर आगामी शैक्षणिक वर्षातील आगामी योजना करत असते. या बैठकीत अभाविपची संघटनात्मक स्थिती, सदस्यता, शैक्षणिक समस्या, विविध कार्यक्रम, अशा विविध विषयांवर चर्चा करून आगामी उद्दिष्ट ठरवले जाणार आहेत.

तसेच या वर्षात भारतीय लोकशाहीचा उत्सव मानल्या जाणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने शत-प्रतीशत मतदान व्हावे यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार असल्याचे मुंबई महानगर मंत्री निधी गाला यांनी सांगितले.



Powered By Sangraha 9.0