रामेश्वरम स्फोटाचे दहशतवाद कनेक्शन, साक्षीदारांची ओळख उघड करणे धोक्याचे : एनआयए

    05-Apr-2024
Total Views | 109
Rameshwaram Cafe Blast NIA Report



बंगळुरु :      बंगळुरु येथील रामेश्वरम कॅफे मध्ये दि. ०१ मार्च २०२४ रोजी झालेल्या स्फोटातील दोन आरोपींविषयी राष्ट्रीय तपास यंत्रणा(एनआयए) माहिती गोळा करत आहे. हा खटला दहशतवादाशी निगडीत असल्याने साक्षीदारांची ओळख सार्वजनिक करणे धोक्याचे असल्याचे एनआयए म्हटले आहे.
 
 


तसेच, हे प्रकरण दहशतवादी घटना असल्याने, साक्षीदारांच्या ओळखीची कोणतीही माहिती तपासात अडथळा आणण्याव्यतिरिक्त समन्स पाठवलेल्या व्यक्तींना धोका निर्माण करू शकते. तसेच, असत्यापित बातम्या प्रकरणातील प्रभावी तपासात अडथळा आणतात. फरार आरोपींच्या अटकेसाठी एनआयएने सर्वांच्या सहकार्याची विनंती केली आहे.

दरम्यान, कर्नाटकचे आरोग्य मंत्री दिनेश राव यांनी एनआयए ने भाजपच्या कार्यकर्त्याला अटक केल्याचे म्हटले होते. त्यानंतर काँग्रेसने भाजपवर टीकेची झोड उठवली होती. याबाबत खुलासा करताना आरोपींच्या बाबत अधिक जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी निगडीत शाळा, महाविद्यालयातील त्यांच्या परिचितांना बोलवत असल्याचे एनआयए ने स्पष्ट केले आहे.


हे वाचलंत का? - महापालिका मुख्यालयाला मालमत्ता करण्याचा डाव!



रामेश्वरम कॅफे स्फोट! NIA कडून UP तील मौलानाची चौकशी

कर्नाटकची राजधानी बेंगळुरू येथील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या तपासात नवनवीन खुलासे होत आहेत. राजाजीनगरमध्ये असलेल्या या कॅफेमध्ये दि. १ मार्च रोजी झालेल्या स्फोटाप्रकरणी अनेकांना अटक करण्यात आली असून, मुख्य संशयितालाही अटक करण्यात आली आहे. पण आता या स्फोटाची तार उत्तर प्रदेशशी जोडलेली दिसत आहे, कारण स्फोटानंतर लगेचच एका धार्मिक केंद्राशी संबंधित मौलाना बंगळुरूहून बरेलीला गेला होता, तो आता परदेशात जाण्याच्या तयारीत होता. या संपूर्ण प्रकरणावर लक्ष ठेवून असलेल्या एनआयएने मौलानाला पकडले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी, दि. २७ मार्च २०२४ सकाळी बरेलीमध्ये एनआयएची टीम स्थानिक पोलिस आणि नायब तहसीलदारांसह मौलानाच्या घरी पोहोचली, पण मौलाना घरी नव्हता. यानंतर मौलानाच्या वडिलांसह ही टीम एका मशिदीत पोहोचली आणि तिथून मौलानाला ताब्यात घेतले. मौलानाची भूमिका संशयास्पद असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यानंतर ही चौकशी करण्यात आली होती.






अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121