पवारांनी ज्योती मेटेंना तिकीट नाकारलं! या नेत्याला दिली बीडमध्ये उमेदवारी

05 Apr 2024 16:38:22
jyoti mete
 
बीड : बीड लोकसभा मतदारसंघासाठी महाविकाश आघाडीने आपला उमेदवार जाहीर केला आहे. भाजपने खासदार प्रितम मुंडेंच्या ऐवजी पंकजा मुंडे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीकडुन ज्योती मेटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटासोबत त्यांच्या चर्चा सुरु होत्या त्यामुळे त्यांना तिकीट मिळेल असं बोललं जात होत.
 
आता बीड लोकसभेतील सर्व चर्चांना पुर्णविराम मिळाला आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाने बजरंग सोनावणे यांना उमेदवारी दिली आहे. ''बीडची जनता फार सुज्ञ असून, बजरंग सोनवणे यांना तिकीट जाहीर झाले असेल तर त्यांना शुभेच्छा' असे पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

हे वाचलत का ?- नाना, मतं मिळविण्यासाठी गिधाडवृतीने वागू नका! राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नका
 
दुसरीकडे या उमेदवारीनंतर ज्योती मेटे नाराज असल्याची चर्चा आहे. ज्योती मेटे बीडमधुन लोकसभा निवडणुक अपक्ष लढवतील असं बोललं जात आहे. ज्योती मेटे यांनी बुधवारी पत्रकार परीषदेत बोलताना शरद पवारांनी उमेदवारी दिली नाही तरी बीडमधुन निवडणुक लढवणारच असं म्हटलं होतं
 
बीड लोकसभा मतदारसंघ मुंडेंचा गड मानला जातो. २०१४ साली गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर विद्यमान खासदार पितम मुंडे यांनी पोटनिवडणुकीत ६,९६,३२१ मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर २०१९ ला प्रितम मुंडे विरुद्द बजरंग सोनावणे अशी लढत पहायला मिळाली होती. त्यात प्रितम मुंडे पुन्हा दिड लाखांहुन अधिक मताधिक्यांने निवडुन आल्या होत्या. आता पुन्हा मुंडे विरुद्ध सोनावणे अशी लढत येथे पहायला मिळणार आहे. या वेळी फक्त प्रितम मुंडे यांच्या एंवजी पंकजा मुंडे उमेदवार असणार आहेत.

Powered By Sangraha 9.0