नाना, मतं मिळविण्यासाठी गिधाडवृतीने वागू नका! राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नका

संजय धोत्रे यांच्याबद्दल निंदनीय वक्तव्याचा निषेध; चंद्रशेखर बावनकुळे यांची नाना पटोलेंवर टीका

    05-Apr-2024
Total Views |
nana
 
मुंबई : अकोल्याचे खासदार संजय धोत्रे प्रकृतीच्या कारणास्तव व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांच्यावर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Nana patole Akola यांनी केलेले वक्तव्य निंदनीय आहे, घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नये आणि मते मिळविण्यासाठी गिधाडांच्या वृत्तीने वागू नका, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
 
 चंद्रशेखर बावनकुळे  यांनी एक्स समाज माध्यमावर नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले. ते म्हणाले की, अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांना दीर्घायुष्य लाभो. त्यासाठी आम्ही सर्वजण रोज प्रार्थना करीत असतो. पण त्यांच्याबद्दल अभद्र बोलून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या असंख्य नागरिकांच्या, अकोला मतरसंघातील मतदारांच्या मनाला वेदना पोहोचविल्या आहेत. तुम्हाला ही जनता माफ करणार नाही.

 
पुढे ते म्हणाले, कावळ्याच्या शापाने गाय मरत नसते. तुम्ही भाजपविरोधात हवा तेवढा खोटा प्रचार करा, लोकांची मते मिळविण्यासाठी कुणासमोरही पायघड्या घाला. पण तुमच्या घाणेरड्या राजकारणासाठी कुणाचे मरण चिंतू नका. कुणाच्या मरणाची वाट बघत त्यावर पोट भरणं ही गिधाडांची वृत्ती असते. आणि केवळ मते मिळविण्यासाठी तुम्ही गिधाडांच्या वृत्तीने वागू नका.