“अर्ध्या तिकीटात नाटकं पाहता येईल का?”; प्रशांत दामले म्हणतात, “मग नाटकही…”

    04-Apr-2024
Total Views |
अभिनेते आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी नेटकऱ्यांच्या प्रश्नांना तुफान प्रतिउत्तर दिले आहे.
 

prashant damle  
 
मुंबई : अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांनी नाट्यसृष्टीला एक वेगळीच झळाली दिली आहे. आत्तापर्यंत त्यांनी वैयक्तिकरित्या १२०० च्या पुढे नाटकांचे प्रयोग केले आहेत. ‘जादू तेरी नजर’, ‘साखर खाल्लेला माणूस’, ‘सारखं काहीतरी होतंय’, ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’, अशी अनेक अजरामर नाटकं (Prashant Damle) त्यांनी रंगभूमीला दिली आहेत. प्रशांत दामले आणि हाऊसफुल्लचा बोर्ड हे समीकरण आता पक्कच झालं आहे. याच नाटकाच्या तिकीटावरुन एक किस्सा घडला असून सोशल मिडियावर एकाने प्रसांत दामलेंना विचारलेल्या प्रश्नाचे त्यांनी गमतीशीर उत्तर दिले आहे. अर्ध्या तिकीटात प्रवेश मिळेल का असा प्रश्न प्रशांत यांना विचारला असून त्याचे मजेशीर उत्तर दामलेंनी त्यांच्या शैलीत दिले आहे.
 
 
prashant damle
 
प्रशांत दामले यांनी फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत त्यांच्या नाटकाच्या आगामी प्रयोगांबद्दल माहिती दिली होती. यावर एका नेटकऱ्याने गमतीत कमेंट करत विचारले आहे की, “प्रशांत दामले सर, गंमत म्हणून विचारत आहे अर्ध्या तिकिटात प्रवेश मिळेल का हो?”. या त्याच्या प्रश्नाला उत्तर देताना प्रशांत दामले म्हणाले, “नाटक पण अर्धच बघता येईल”.
 
हे वाचलंत का? -  ‘नवरा माझा नवसाचा’ मधून प्रशांत दामले झाले होते कट!, जयवंत वाडकरांनी सांगितला किस्सा
 
दरम्यान, मराठी नाटकं प्रेक्षकांपर्यंत अधिक पोहोचावी यासाठी नाटकांच्या ऑनलाईन तिकीट बुकिंगसाठी प्रशांत दामले व त्यांच्या सहकाऱ्यांनी तिकिटालय हे अ‍ॅप सुरू केलं आहे. प्रेक्षकांना या ॲपवर आपल्या सोयीनुसार नाटकाची व सिनेमांची तिकीटं बुक करता येणार आहेत. त्यामुळे अधिकाधिक मराठी नाटकं ही प्रेक्षकेपर्यंत आणि नल्या पिढीपर्यंत पोहोचावी यासाठी प्रत्येक कलाकार मेहनत करत आहे.