शेअर बाजार विश्लेषण: घसरण! शेअर बाजारात नफा बुकिंग सुरू सेन्सेक्स १८८.५० अंशाने घटत ७४४८२.७८ व निफ्टी ३८.५५ अंशाने घटत २२६०४.८५ पातळीवर

बँक निफ्टीत घसरण ! मेटल आयटी समभागात घसरण तर ऑटो, रियल्टी समभागात वाढ कायम

    30-Apr-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण: आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.सकाळची रॅली अखेरच्या सत्रात घसरणीत बदलली आहे. सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकात आज घसरण झाली आहे.मुख्यतः बँक निर्देशांकातील वाढ घसरणीत बदलली आहे.एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांक आज १८८.५० अंशाने घट होत ७४४८२.७८ पातळीवर पोहोचला व निफ्टी ५० निर्देशांक ३८.५५ अंशाने घट होत २२६०४.८५ पातळीवर पोहोचला आहे.
 
सेन्सेक्स बँक निर्देशांकात आज ८३.३४ अंशाने घट झाली आहे. निफ्टी बँक निर्देशांक २७.३० अंशाने घसरत ४९३९६.७५ पातळीवर स्थिरावला आहे. बीएसई (BSE) मध्ये मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.४९ व ०.१० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एनएसई (NSE) मध्ये मिडकॅपमध्ये कुठलाही बदल झालेला नाही.तर स्मॉलकॅपमध्ये ०.२ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
एनएसईत आज क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला आहे.सकाळप्रमाणे सर्वाधिक घसरण आयटी,मिडिया,फार्मा,मेटल समभागात झाला असून सर्वाधिक फायदा निफ्टी ऑटो (१.८२ %) रियल्टी (१.४५%),पीएसयु बँक (०.४८%) समभागात झाला आहे.
 
बीएसईतील आज वधारलेल्या समभागात ७ ते १० टक्क्यांनी वाढ झालेली आहे. तर घसरलेल्या समभागात (Shares) ४ ते ९ टक्क्यांनी घट झाली आहे.एनएसईतील वाढलेल्या समभागात १ ते ४ टक्क्यांनी वाढ झाली असून घसरलेल्या समभागात १ ते २ टक्क्यांनी घट झाली आहे.
 
बीएसईत आज एकूण ३९५० समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १८२० समभाग आज वधारले आहेत तर १९९५ समभागांच्या मूल्यांकनात आज घसरण झाली आहे.त्यातील २६७ समभागांची किंमत आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक राहिली असून २२ समभागांच्या मूल्यांकनात ५२ आठवड्यात सर्वाधिक घसरण झाली आहे.एकूण ३३३ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले असून २०२ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
एनएसईत आज एकूण २७५१ समभागाचे ट्रेडिंग झाले असताना १२२० समभाग आज वधारले आहेत तर १४०३ समभागात आज घसरण झाली आहे. त्यातील १५५ समभागांचे मूल्यांकन आज ५२ आठवड्यातील सर्वाधिक राहिले असून ११ समभागांचे मूल्यांकन ५२ आठवड्यात सर्वाधिक कमी राहिले आहेत. एकूण ११८ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर ५२ समभाग आज लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याने भारतीय बाजारात क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ झाली आहे.WTI Future क्रूड निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.२४ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Brent क्रूड निर्देशांकात ०.३३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.भारतातील एमसीएक्स क्रूड निर्देशांकात ०.३३ टक्क्यांनी वाढ झाल्याने भारतातील तेलाच्या किंमती ०.३३ टक्क्यांनी वाढत ६९२२ प्रति बॅरेलवर पोहोचल्या आहेत.
 
सोन्याच्या किंमतीत मात्र आज जागतिक पातळीवर घट झाली होती. युएस गोल्ड फ्युचरमध्ये ०.७९ टक्क्यांनी घट झाली आहे. सोन्याच्या किंमतीत सकाळी घसरण झाली असली तरी संध्याकाळपर्यंत भारतातील सराफा बाजारात सोन्याच्या दरात कुठलाही बदल झाला नाही. एमसीएक्सवर सोने निर्देशांकात आज ०.८५ टक्क्यांनी घसरण होत ७०९९४.०० रुपयांवर सोने पोहोचले आहे चांदीच्या निर्देशांकातही १.३५ टक्क्यांनी घट होत ८१३७०.०० पातळीवर पोहोचली आहे.काही संकेतस्थळावरील माहितीनुसार २२ कॅरेट सोन्याच्या दरात ०.३८ टक्क्यांनी व २४ कॅरेट सोन्याच्या दरात ०.३८ टक्क्यांनी घट झाल्याने २२ कॅरेट सोने ६५९१८ व २४ कॅरेट सोने ७१९६३ रुपयांवर पोहोचले आहे.
 
बाजार का घसरले - आज बाजारातील भावना संध्याकाळपर्यंत सकारात्मक असल्यातरी अखेरच्या क्षणी गुंतवणूकदारांनी युएस फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होईल का या चिंतेने सावधतेने खेळी केली. काही प्रमाणात परदेशी गुंतवणूकदारांनी आज आपली गुंतवणूक काढून घेतली आहे. चौथ्या तिमाहीचा कंपन्यांच्या व बँकांच्या चांगल्या निकालाने सकारात्मक बँक निर्देशांक मात्र अखेरीस नकारात्मक स्थितीत घेतला. अनेकांनी अखेरच्या क्षणी नफा बूकिंग केल्याने बाजारात अखेरीस घसरण दिसून आली.
 
मध्यपूर्वेतील दबाव शांत झाला असला तरी क्रूड मधील मागणीत वाढ झाल्याने बाजारातील क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ झाली होती.जागतिक पातळीवरील डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत वधारल्याने त्याचा काही अंशी फायदा बाजारात झाला आहे. आज डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत ८४.४६ रुपयांवर स्थिरावली होती.अमेरिकन बाजार फेडरल रिझर्व्ह व्याजदराबाबत  बैठकीत काय निर्णय घेतला जातो व युएस बाजारातील रोजगाराचे आकडे काय येतील याचा विचार करत गुंतवणूकदारांनी आखडता हात घेतला होता.निकालांच्या पार्श्वभूमीवर लार्जकॅप समभागांनी विश्रांती घेतली असली तरी मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये झालेल्या वाढीमुळे नुकसानाचे प्रमाण कमी झाले आहे.
 
आज बीएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४०६.५८ लाख कोटी होते.एनएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल ४०३.०४ लाख कोटी होते.
 
बीएसईत एम अँड एम,पॉवर ग्रीड, बजाज फिनसर्व्ह,टाटा मोटर्स,मारूती सुझुकी,बजाज फायनान्स,इंडसइंड बँक,एशियन पेंटस, रिलायन्स, नेस्ले, विप्रो,अल्ट्राटेक सिमेंट, एचयुएल, एक्सिस बँक, एनटीपीसी, एसबीआय, लार्सन, टायटन कंपनी, एचडीएफसी बँक या समभागात आज वाढ झाली आहे. टेक महिंद्रा, जेएसडब्लू स्टील, टाटा स्टील, एचसीएलटेक, सनफार्मा, टीसीएस, लार्सन, कोटक महिंद्रा, इन्फोसिस, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, आयटीसी टाटा कंपनी, एसबीआय, नेस्ले या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत एम अँड एम,पॉवर ग्रीड, श्रीराम फायनान्स, हिरो मोटोकॉर्प, इंडसइंड बँक, बजाज ऑटो, एचडीएफसी लाईफ, बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, ग्रासिम, एसबीआय लाईफ इन्शुरन्स, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, टाटा मोटर्स, अदानी पोर्टस,एक्सिस बँक,एशियन पेंटस, कोल इंडिया, एचयुएल,रिलायन्स, अल्ट्राटेक सिमेंट, एनटीपीसी या समभागात आज वाढ झाली असून टेक महिंद्रा, जेएसडब्लू स्टील, एचसीएलटेक, डॉ रेड्डी, टाटा स्टील, सनफार्मा, टीसीएस, लार्सन, इन्फोसिस, कोटक महिंद्रा, अदानी एंटरप्राईज, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल, एचडीएफसी बँक, सिप्ला, ब्रिटानिया, टायटन कंपनी, ओएनजीसी, विप्रो, नेस्ले, एसबीआय या समभागात घसरण झाली आहे.
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले, 'आज बाजारात निफ्टी फायनान्शियल सर्विस निर्देशांकातील सेटलमेंटमुळे आणि प्रोफिट बुकिंगमुळे शेवटच्या एक तासात प्रायव्हेट बॅकांनी तसेच टाटा स्टील,जिंदाल स्टील यांनी वरच्या रेटवर नफा बुक केला.बाजारातील हा सर्व घटनाक्रम उपयुक्त आहे. या सर्व घटना कंसोलीडेशन बरोबरीने इतर निर्देशांक स्टाॅक करेक्ट होताना दिसतात,इंडियन ऑईलचे नकारात्मक रिझल्ट आलेले आहेत.निफ्टी २२५०० च्या लेवल कशी धरून ठेवतो हे महत्त्वपूर्ण ठरेल.तीन चार दिवसाच्या तेजीनंतर एक दोन दिवस करेक्शन हे बाजाराकरीता खुप फायदेशीर ठरेल.
 
आजच्या बाजारावर विश्लेषण करताना असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव एनालिस्ट निरज शर्मा म्हणाले,'सकारात्मक जागतिक संकेतांमुळे देशांतर्गत बेंचमार्क निर्देशांक मंगळवारी उच्च पातळीवर उघडले.मजबूत खरेदीच्या व्याजामुळे,निफ्टीने २२७८३.३५ चा ताजा सार्वकालिक उच्चांक नोंदवला. पण त्यानंतर, लक्षणीय प्रमाणात नफा बुकिंग झाली आणि निर्देशांक २२६०५ वर दिवस संपला.शिवाय,व्याजदरांवरील यूएस फेडरल बैठकीपूर्वी भारत VIX, अस्थिरता निर्देशांक ५.१९% ने वाढला. तांत्रिक दृष्टिकोनातून, दैनंदिन प्रमाणात निर्देशांकाने मागील उच्चांकाच्या जवळ एक मंदीची मेणबत्ती तयार केली आहे.अशाप्रकारे, २२७८० -२२८०० हे अल्पावधीत निर्देशांकासाठी मजबूत अडथळा म्हणून काम करतील.
 
जोपर्यंत निर्देशांक २२८०० च्या खाली राहील तोपर्यंत २२५०० -२२३०० च्या दिशेने अल्पकालीन रिट्रेसमेंट शक्य आहे. जर निर्देशांक २२८०० च्या वर टिकला तर रॅली २३००० -२३१००च्या पातळीवर वाढू शकते.अल्प मुदतीसाठी, २२५००आणि २२३०० मजबूत समर्थन पातळी म्हणून काम करतील, तर २२८०० आणि २३००० निर्देशांकासाठी अडथळे म्हणून काम करतील.
 
बँक निफ्टीने अंतर उघडले आणि ४९९७४.७५ ची विक्रमी पातळी नोंदवली. तथापि,शेवटच्या तासात निर्देशांकावर मोठ्या प्रमाणावर विक्रीचा दबाव दिसून आला.परिणामी, बँक निफ्टीने दिवसाला किरकोळ नकारात्मक नोट ४९३९७ वर स्थिरावले. तांत्रिकदृष्ट्या, दैनंदिन प्रमाणात, इंडेक्सने वाढत्या वेज पॅटर्नच्या वरच्या ट्रेंड लाइन रेझिस्टन्सजवळ शूटिंग स्टार कँडलस्टिक पॅटर्न तयार केला आहे जो सुमारे ५०००० स्तरांवर ठेवला आहे.अशा प्रकारे,अल्प मुदतीसाठी नफा बुक करणे आणि बँक निफ्टीमध्ये नवीन ट्रिगर्सची प्रतीक्षा करणे उचित आहे.'
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी व्यक्त होताना बोनझा पोर्टफोलिओचे रिसर्च एनालिस्ट वैभव विदवानी म्हणाले,'आज निफ्टी ०.१७ % घसरत २२६०४ वर बंद झाला तर सेन्सेक्स ०.२५ % घसरून ७४४८२ वर बंद झाला.निफ्टी ऑटो आणि निफ्टी रियल्टी ही क्षेत्रे आज अनुक्रमे १.८२ % आणि १.४५% ने वाढलेली आहेत. यूएस व्याजदरांवरील संकेतांच्या अपेक्षेने,  गुंतवणूकदारांनी फेड बैठकीपूर्वी सावध दृष्टिकोन स्विकारला.
 
त्याच्या उपकंपनी असिर्वाद मायक्रोफायनान्सच्या प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (IPO) सह पुढे जाण्यासाठी SEBI कडून मंजुरी मिळाल्यानंतर,मणप्पुरम फायनान्स १.६५ % वाढीने बंद झाला. अशिर्वाद मायक्रोफायनान्सने १६ फेब्रुवारी रोजी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे १५०० कोटी रुपयांच्या इनिशियल पब्लिक ऑफरिंग (IPO) साठी प्रस्तावित केले.
 
M&M, पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन, श्रीराम फायनान्स, हिरो मोटोकॉर्प आणि बजाज ऑटो हे निफ्टीमध्ये सर्वाधिक नफा मिळवणाऱ्यांमध्ये होते, तर टेक महिंद्रा,बीपीसीएल,जेएसडब्ल्यू स्टील,एचसीएल टेक्नॉलॉजीज आणि सन फार्मा यांचा तोटा होतो.'
 
बँक निफ्टीविषयी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल डेरिएटिव एनालिस्ट कुणाल शहा म्हणाले, 'बँक निफ्टीने एक्सपायरी दिवसात अस्थिर ट्रेडिंग सत्र पाहिलं, पहिल्या सहामाहीत बुल्सचे वर्चस्व होते आणि दुसऱ्या सहामाहीत अस्वल नियंत्रणात होते. जरी निर्देशांक ५०००० चा टप्पा गाठण्यात कमी पडला असला तरी, एकूणच भावना तेजीत राहिली. निर्देशांकात घसरण विशेषत: ४९००० च्या आसपास नोंदलेल्या भक्कम समर्थनासह, खरेदीच्या संधी म्हणून पाहिले पाहिजे, जेथे सर्वाधिक खुल्या व्याज पुट बाजूवर आहेत.'
 
निफ्टीविषयी प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे सिनियर टेक्निकल एनालिस्ट रुपक डे म्हणाले,' निफ्टीवर विक्रीचा दबाव दिसून आला कारण त्याला मागील स्विंग उच्च जवळ प्रतिकाराचा सामना करावा लागला, परिणामी तो कमकुवत बंद झाला. इतर निर्देशक जसे की 20-दिवसांचे सिंपल मूव्हिंग एव्हरेज (SMA) आणि ५०-दिवसांचे SMA निर्देशांक मूल्यापेक्षा खाली स्थित आहेत, असे सूचित करतात की चालू असलेला सकारात्मक कल अबाधित आहे.रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स (RSI) पुढील काही दिवसांत, हेडलाइन इंडेक्स २२७८३ च्या सर्वकालीन उच्च पातळीच्या वर न गेल्यास तो बाजूला राहू शकतो.तात्काळ समर्थन २२५०० वर ठेवले आहे, ज्याच्या खाली निर्देशांक आणखी कमी होऊ शकतो."