आशियाई देशांतील भारत व चीनची अर्थव्यवस्थेबाबत आयएमएफ म्हणाले....

दोन्ही अर्थव्यवस्थेत वाढ होण्याचे इंटरनॅशनल मॉनेटरी फंडचे अनुमान

    30-Apr-2024
Total Views |

imf
 
 
मुंबई: इंटरनॅशनल मॉनेटरी फंडने आशिया खंडातील अर्थव्यवस्था तेजीत राहणार असल्याचे विधान केले आहे. आशिया खंडातील चीन व भारत यांची अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असल्याचे अनुमान बँकेने नोंदवले आहे.आर्थिक वर्ष २०२४ मध्ये आशियातील अर्थव्यवस्था ४.५ टक्क्यांपर्यंत वाढणार असल्याची माहिती बँकेने दिली आहे.ऑक्टोबर २०२४ मधील अर्थव्यवस्थेच्या बाबतीत ०.३ टक्क्यांनी वाढ झाली असली तरी यापूर्वी असलेल्या ५ टक्क्यांच्या वाढीच्या अनुमाना पेक्षा हा दर कमी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
 
मागच्या महिन्यातील शेवटी इंटरनॅशनल मॉनेटरी फंडने भारताच्या अर्थव्यवस्थेत मोठे भाकीत करत भारतीय अर्थव्यवस्था मजबूत स्थितीत असल्याचे सुतोवाच केले होते.यानंबरच्या आधारे या अहवालात भारताची अर्थव्यवस्था आगामी काळात सुदृढ स्थितीतच राहणार असल्याचे अनुमान व्यक्त केले आहे. चीन बाबत बोलताना देखील पहिल्या तिमाहीत वाढलेल्या उत्पादनाबरोबर वाढत्या मागणीमुळे चीनच्या अर्थव्यवस्थेत प्रगती होणार असल्याचे आयएमएफ (International Monetary Fund) ने म्हटले आहे
 
जागतिक निश्चलनीकरण आणि मध्यवर्ती बँकेच्या कमी व्याजदरांच्या संभाव्यतेमुळे सॉफ्ट लँडिंगची अधिक शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे नजीकच्या काळातील जोखीम आता मोठ्या प्रमाणात संतुलित आहेत,”असे आयएमएफच्या आशिया आणि पॅसिफिक विभागाचे संचालक कृष्णा श्रीनिवासन यांनी एका ब्लॉग पोस्टमध्ये लिहिले आहे.
 
चीनच्या सरकारने अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आपल्या खर्चात वाढ केली होती. कारण यापूर्वी चीनच्या रिअल इस्टेट सेक्टरमधील मंदी पाहता सरकारने काही पुढाकार घेत ५ टक्के दरवाढीसाठी प्रयत्न केले होते.भारताच्या केंद्र सरकारनेही आपल्या खर्चात (भांडवली खर्चात) वाढ केली होती. इंटरनॅशनल मॉनेटरी फंडने सांगितल्याप्रमाणे भारताच्या विकास दरात ६. ८ टक्क्यांनी वाढ होणार आहे.तरीदेखील काही अडचणी अर्थव्यवस्थेसमोर आव्हान म्हणून उभ्या राहतील असे इंटरनॅशनल मॉनेटरी फंडला वाटते.
 
आयएमएफच्या अधिकारी यांनी अमेरिकन फेडरल रिझर्व्ह व्याजदरात कपात होण्याच्या शक्यतेच्या प्रतिक्षेत राहण्यापेक्षा स्वतःच्या पतधोरण निर्णयावर अवलंबून रहावे असे म्हटले आहे.