आनंदाची बातमी: लवकरच ईपीएफओ खात्यात व्याज जमा होणार!

    30-Apr-2024
Total Views |

epfo
 
 
मुंबई: The Employees Provident Fund Organisation (EPFO) आपल्या कर्मचाऱ्यांच्या एम्प्लॉइज प्रोव्हिडंट फंडमधील खात्यात व्याज जमा करण्याची शक्यता आहे.पात्र खात्यात हे व्याज जमा केले जाईल. एका व्यक्तीने सोशल मीडियावर ईपीएफओला विचारल्यानंतर त्यांचे उत्तर म्हणून 'ही प्रकिया चालू आहे.लवकरच खात्यात व्याज जमा केले जाईल व पूर्णपणे दिले जाईल त्यात कुठलेही नुकसान होणार नाही 'अशी प्रतिक्रिया दिलेल्या उत्तरात ईपीएफओने दिली आहे.
 
फेब्रुवारी महिन्यात आर्थिक वर्ष २०२३-२४ मधील प्रोव्हिडंट फंडसाठी व्याजदर जाहीर करण्यात आला होता.१० बेसिस पूर्णांकाने हे दर वाढवत ८.२५ टक्क्यांवर करण्यात आले होते. मागील वर्षी हे व्याजदर ८.१५ टक्क्यांवर ठरवण्यात आले होते.ईपीएफओ लागू असलेले कर्मचारी व्याजदर जमा होण्याची वाट पाहत असताना या बातमीमुळे कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.एकदा हा निधी जमा झाल्यास वेबसाईटवर कर्मचारी यासंदर्भातील माहिती पाहू शकतात.ईपीएफ बॅलन्स पाहण्यासाठी मिस कॉल किंवा एस एम एस मार्फत मिळवू शकतात.परंतु यापूर्वी त्यांचा Universal Account Number (UAN) हा चालू असावा लागणार आहे.
 
 
 
 
ईपीएफओ बॅलन्स कसा पाहणार ?

-सर्वांत आधी EPFO मधील वेबसाईटवर जा
- त्यानंतर ' Our Services ' मध्ये जाऊन ' For Employees ' वर क्लिक करा
-त्यानंतर Member Passbook मध्ये जाऊन Services option वर जा
- त्यानंतर The EPF passbook पेज वर passbook.epfindia.gov.in आल्यावर युजर नेम ( UAN) टाका
- त्यानंतर Employment बाबत Detail निवडा
- शेवटी मेंबर आयडी सिलेक्ट केल्यानंतर EPF passbook दिसेल यामध्ये EPF मधील बॅलन्स दिसेल