आगामी लोकसभा निवडणुकीकरिता काँग्रेसला भारतविरोधी शक्तींकडून पाठिंबा!

    03-Apr-2024
Total Views |
kerala-sdpi-supporting-congress-in-lok-sabha
 

नवी दिल्ली :       केरळमध्ये आगामी लोकसभा निवडणूक २०२४ करिता केंद्र सरकारने बंदी घातलेली कट्टर इस्लामिक संघटना पीएफआय संघटनेकडून काँग्रेसला पाठिंबा देण्यात आला आहे. केरळमध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट(युडीएफ)ला पीएफआयकडून पाठिंबा दर्शविण्यात आला आहे. पीएफआयचा एक राजकीय गट असून केरळमधील युडीएफला लोकसभेकरिता पाठिंबा देण्यात आला आहे.

दरम्यान, केरळ प्रदेशाध्यक्ष मुवत्तुपुझा अश्रफ मौलवी यांनी काँग्रेस आणि केरळमधील त्यांच्या गटाला पाठिंबा जाहीर केला आहे. एसडीपीआयने काँग्रेसला पाठिंबा जाहीर केल्यानंतर, 'काँग्रेसचा भारताच्या सार्वभौमत्वाशी काहीही संबंध नाही.', असे म्हणत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्याचबरोबर, पीएफआयच्या राजकीय आघाडीचे नाव सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया असे आहे.


प्रदेशाध्यक्ष अशरफ मोलवी यांनी एर्नाकुलम प्रेस क्लबमध्ये पत्रकार परिषद घेत काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला आहे. मौलवी म्हणाले की, त्यांनी काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे कारण काँग्रेस हा भाजपच्या विरोधात उभ्या असलेल्या इंडिया आघाडीचा प्रमुख चेहरा आहे. एसडीपीआयने २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केरळमध्ये लोकसभेच्या ९ जागा लढविल्या होत्या.

केरळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष एमएम हसन यांना या मुद्द्यावर विचारले असता ते म्हणाले की, आम्हाला आत्ताच कळले आहे की एसडीपीआय आम्हाला पाठिंबा देत आहे. एसडीपीआय हा कट्टरपंथीयांशी निगडीत पक्ष असल्याचे त्यांना सांगण्यात आले तेव्हा त्यांनी हे पाहणे आमचे काम नाही असे उत्तर दिले. पक्षाच्या बैठकीत हा विषय मांडणार आहोत, असे प्रदेशाध्यक्ष हसन यांनी स्पष्ट केले.