सद्यस्थितीस नेहरूंचं 'चायना फर्स्ट' धोरण जबाबदार, परराष्ट्र मंत्र्यांचे सीमावादाबाबत मोठं विधान!

    03-Apr-2024
Total Views |
foreign-minister-jaishankar-says-nehru-kept-china-first


नवी दिल्ली :      चीन-पाकिस्तानने बळकावलेले प्रदेश परत घेण्याबाबत भारताने विचार करावा की सद्दस्थिती स्वीकारावी या प्रश्नावर परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी भाष्य केले आहे. तत्कालीन पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी चीनच्या धोक्याला कमी लेखण्याची चूक ही सद्दस्थितीस कारणीभूत आहे, असा आरोप अहमदाबाद येथे गुजरात चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीतर्फे आयोजित एका कार्यक्रमात केला आहे.




दरम्यान, एस. जयशंकर यांना चीन संबंधित प्रश्न विचारता असता त्यांनी तत्कालीन पंतप्रधान नेहरू यांच्या चुकांवर हल्ला चढविला आहे. तसेच, चीन-पाकिस्तानने बळाकविलेले प्रदेश पुन्हा परत घेण्याबाबत भारताने विचार करावा का, याविषयी मोठे वक्तव्य केले आहे. ते म्हणाले, तत्कालीन गृहमंत्री सरदार पटेल यांनी १९५० रोजी चीनच्या हालचालींबाबत नेहरूंना इशारा दिला होता.


हे वाचलंत का? - दिल्ली दारू घोटाळा : केजरीवाल यांची तब्येत खालावली, २१ मार्चपासून ईडी कोठडीत!


त्याचबरोबर, पटेल यांनी नेहरूंना सांगितले होते की, आपण पहिल्यांदाच चीन आणि पाकिस्तानच्या दुहेरी आघाडीला सामोरे जात आहोत, अशी परिस्थिती यापूर्वी कधीही नव्हती. पटेल यांनी नेहरूंना असेही सांगितले की, चीनी लोक काय बोलत आहेत यावर त्यांचा विश्वास नाही, त्यांचे हेतू वेगळे दिसत आहेत आणि आपण या बाबतीत अत्यंत सावधगिरीने वागले पाहिजे, असे जयशंकर यावेळी म्हणाले.

 
भारताने संयुक्त राष्ट्रात जागा नाकारली तेव्हा...

भारताने संयुक्त राष्ट्रात जागा नाकारली तेव्हा जयशंकर यांनी नेहरूंवरही हल्ला चढविला. जयशंकर म्हणाले, "जेव्हा संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या कायमस्वरूपी जागेबाबत चर्चा झाली तेव्हा ही जागा भारताला देऊ केली गेली होती, परंतु, तेव्हा नेहरूंची भूमिका अशी होती की, आम्हीही या जागेचा हक्कदार आहोत, पण ती आधी चीनला मिळाली पाहिजे.", अशी तेव्हा भारताकडून घेण्यात आली होती.

जयशंकर म्हणाले की, सध्याचे सरकार 'राष्ट्र प्रथम' धोरण अवलंबत आहे. काश्मीरचा मुद्दा संयुक्त राष्ट्रात तेव्हा त्यांनी बोलून दाखविले. ते म्हणाले की, सरदार पटेल यांना काश्मीरचा वाद संयुक्त राष्ट्रात नेण्याची इच्छा नव्हती पण नेहरूंनी तेच केले. ते म्हणाले की, सरदार पटेल यांना माहीत होते की, संयुक्त राष्ट्र पक्षपाती असून तुम्ही तुमची केस पक्षपाती असलेल्या न्यायाधीशाकडे घेऊन जाल का? ते म्हणाले की हे प्रकरण यूएनमध्ये नेल्यानंतर आम्हाला पीओकेची लष्करी कारवाई थांबवावी लागल्याचा पुनरुच्चार परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी केला.