katchatheevu island controversy : याच बेटावरुन वाजपेयींनीही इंदिरा सरकारला झापलं होतं!

    03-Apr-2024
Total Views |
india-sri-lanka-katchatheevu-island-story
 
नवी दिल्ली :    कच्छथीवू बेटाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनीदेखील तत्कालीन इंदिरा सरकारला झापले होते. अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान असताना संसदेत कच्छथीवू बेटासंदर्भात चर्चा झाली होती. त्यावेळेस दिवंगत माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन इंदिरा सरकारला झापले होते. कच्छथीवू बेट श्रीलंकेला अनौपचारिकरीत्या देण्यात आल्याचा आरोप वाजपेयींनी संसदेत केला होता.

दरम्यान, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनीदेखील या मुद्द्यावर तत्कालीन इंदिरा सरकारला खडेबोल सुनावले होते. त्यांनी म्हटले होते की, “केंद्र सरकारने दि. २२ जून रोजी कच्छथीवु देण्याचा करार केला होता. वाजपेयींनी आरोप करत म्हटले की, तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि श्रीलंकेचे पंतप्रधान यांच्यात जानेवारीमध्ये संभाषण झाले होते, त्या वेळी अनौपचारिकपणे कच्छथीवूला श्रीलंकेकडे सोपवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.


हे वाचलंत का? - भारत जोडो यात्रेची बिलं काँग्रेसनं थकवली! कंटेनरचे पैसे मागत राहुल गांधींना सुनावले खडेबोल


त्यावेळेस कुंभकोणमचे खा. सेजिहयान यांनी संसदेत म्हटले होते की, , "भारताला जमीन देण्याचा हा घृणास्पद करार करण्यापूर्वी सभागृहाला विश्वासात घ्यायला हवे होते. श्रीलंकेशी संबंध सुधारणे आवश्यक आहे, असे आमचे मत आहे, परंतु तसे केल्याने सरकारकडून कायद्याचे उल्लंघन होते. तसेच, तत्कालीन खा. के. मनोहरन यांनी इंदिरा सरकारच्या कचाथीवू बेट श्रीलंकेला देण्याचा निर्णय देशविरोधी असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, "हा जगातील सर्वात निरुपयोगी करार असून हा देशाच्या अखंडतेवर हल्ला आहे."

'देशाच्या पाठीमागे श्रीलंकेला कच्चाथीवू दिले'

ते पुढे म्हणाले, “विरोधकांनी सभागृहात हा मुद्दा उपस्थित केला तेव्हा आम्ही कोणतीही तडजोड केली नसल्याचे सांगण्यात आले. सरकारने सभागृहाला विश्वासात घेतले नव्हते. देशाच्या पाठीमागे भारताची जमीन परदेशांना देण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष महोदय, कृपया करार पहा. ही तडजोड नसून समर्पण आहे. जर जमीन दिल्याने मैत्री झाली असती तर आम्हाला कोणत्याही शेजारी देशाशी लढण्याची गरज पडली नसती, असे म्हणत वाजपेयींनी इंदिरा सरकारवर हल्लाबोल केला होता.