केजरीवालांच्या अडचणीत वाढ, मद्य धोरण बनविण्यात प्रत्यक्ष सहभाग!

    03-Apr-2024
Total Views |
arvind-kejriwal-is-kingpin-in-delhi-liquor-policy


नवी दिल्ली :     
दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. मद्य घोटाळाप्रकरणी ईडी कोठडीत कसून चौकशी करण्यात येत असून आता ईडीकडून केजरीवाल यांच्या अटकेवर कोर्टात माहिती देण्यात आली आहे. दिल्ली मद्य धोरण बनविण्यात अरविंद केजरीवाल यांची थेट भूमिका होती, ते संपूर्ण कटात सहभागी आहेत. त्यांच्यामार्फतच मनी लाँड्रिंग करण्यात आल्याचे ईडीकडून कोर्टात देण्यात आली आहे.
 
दरम्यान, सक्तवसुली संचालनालय(ईडी)कडून अरविंद केजरीवाल यांना अटक का करण्यात आली याबाबत न्यायालयाला सांगितले. दिल्ली दारू घोटाळ्यातील लाभ केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाला झाला असून केजरीवाल यांचेच या सर्व कामांवर नियंत्रण आहे. तसेच, या प्रकरणातील साक्षीदारांच्या जबाबावरून हे धोरण बनविण्यात केजरीवाल यांचा सहभाग असल्याचे ईडीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


हे वाचलंत का? - तैवानला शक्तिशाली भूकंपाचा धक्का, त्सुनामीची भीती, शेजारील देशांना हाय अलर्ट!

 
दिल्ली उच्च न्यायालयात ईडीकडून मद्य घोटाळाप्रकरणी दावा करण्यात आला असून अरविंद केजरीवाल हे दिल्ली दारू धोरण घोटाळ्यातील मुख्य सूत्रधार आहेत. ईडीने दारू घोटाळ्यातील अरविंद केजरीवाल यांचे 'मुख्य सूत्रधार' म्हणून वर्णन केले असून ते आम आदमी पार्टीच्या माध्यमातून पैशाची लाँड्रिंग करत असल्याचे म्हटले आहे.

ईडीने अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचे कारण देतानाच सांगितले केजरीवाल ईडीच्या समन्सला कोणताही प्रतिसाद दिला नाही. तब्ब्ल ९ वेळा ईडीकडून समन्स बजावण्यात आले असूनही चौकशीत सहभागी झाले नाहीत. त्याचवेळी आम आदमी पक्षाने ईडीला खोटे आरोप करत असून मनी ट्रेल सापडत नसतानाही खोटे दावे करत असल्याचे म्हटले आहे. मनी ट्रेलची कल्पना खुद्द सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.