तैवानला शक्तिशाली भूकंपाचा धक्का, त्सुनामीची भीती, शेजारील देशांना हाय अलर्ट!

    03-Apr-2024
Total Views |
Taiwan-massive-earthquake-hits-hualien


नवी दिल्ली : 
   तैवान ७.५ रिश्टर स्केल तीव्रतेचा शक्तिशाली भूकंपाचा हादरा बसला असून त्सुनामीची भीती निर्माण झाली आहे. तैवानमधील भूकंपाच्या हादऱ्यानंतर आता जपानपासून चीनपर्यंत हाय अलर्ट देण्यात आला आहे. या भूकंपाची तीव्रता इतकी होती की, अनेक इमारती कोसळल्या असून त्यात लोक अडकल्याची माहिती मिळत आहे.




दरम्यान, तैवानमधील भूकंपाचा केंद्रबिंदू हुलियान प्रांताच्या पूर्व किनारपट्टी समुद्रात होता. या भूकंपामुळे जपान व तैवान या देशांसोबतच फिलिपाईन्सलाही त्सुनामीचा इशारा देण्यात आला आहे. तैवानची राजधानी तैपेईमध्ये विनाशकारी भूकंप झाला आहे. या भूकंपामुळे अनेक इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. तसेच, मोठ्या प्रमाणावर भूस्खलनही झाले आहे.


हे वाचलंत का? - चुन चुन कर साफ करो! मोदींनी युवराजांना धु धु धुतलं!


७.५ रिश्टर स्केल भूकंप धक्क्यानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला असून सुदैवाने अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. या भूकंपामुळे अन्य आशियाई देशांमध्ये सतर्कता बाळगण्यात येत आहे. दरम्यान, भूकंपानंतर त्सुनामीचा इशारा देण्यात आला असला तरी किनारपट्टी भागातील नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.




राजधानी तैपेईमध्ये भूकंपाचा धक्का बसल्यानंतर त्सुनामीचा इशारा दिल्यानंतर जपानने ओकिनावाच्या दक्षिणेकडील किनारी भागात स्थलांतराचा सूचना जारी करण्यात आला आहे. त्सुनामीसदृश्य परिस्थिती उद्भवल्यास जपानच्या नैऋत्य किनारपट्टीच्या मोठ्या भागात ३ मीटर पर्यंतच्या लाटा उसळण्याची शक्यता जपानच्या हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे.