चुन चुन कर साफ करो! मोदींनी युवराजांना धु धु धुतलं!

    02-Apr-2024
Total Views |
pm-narendra-modi-rudrapur-uttarakhand


नवी दिल्ली : 
    आगामी लोकसभा निवडणूक २०२४ च्या पार्श्वभूमीवर प्रत्येक पक्षाकडून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचा दौरा करत येथील जनतेशी संवाददेखील साधला आहे. "देशात ६० वर्षे सत्तेत राहिलेले केवळ १० वर्षे सत्तेशिवाय राहिल्यानंतर देशाला लावण्याचे बोलत आहेत.", असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, उत्तराखंडच्या जनतेला देशातून काँग्रेसचा सफाया करण्याचे आवाहन करतानाच 'चुन चुन कर साफ करो' असे म्हणत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदी यांनी उत्तराखंडमधील उधम सिंह नगर जिल्ह्यातील रुद्रपूर शहरात जाहीर सभेत जनतेला संबोधित केले. मोदी म्हणाले, "काँग्रेसच्या राजपुत्राने दावा केला आहे की जर भारतातील लोकांनी भाजपला तिसऱ्यांदा मतदान केले तर देश जळून जाईल."


हे वाचलंत का? - बंगालमध्ये शेख हसनने तोडले मंदिर, पोलिसांची हिंदूंना अरेरावी! व्हिडीओ व्हायरल!


पंतप्रधान मोदींनी काँग्रेसला आणीबाणीची मानसिकता असलेला पक्ष म्हटले आहे. तसेच, त्यांचा लोकशाहीवर विश्वास नसून म्हणूनच ते लोकांना जनादेशाच्या विरोधात भडकवत आहेत, असा गंभीर आरोप पंतप्रधान मोदीनी केला आहे. त्यांना भारताला अराजकतेकडे टाकायचे आहे. त्यानंतर लगेच देशाच्या एकात्मतेबद्दल बोलणारे कर्नाटकचे काँग्रेस नेते डी के सुरेश यांच्या विधानाची आठवण करून देतानाच काँग्रेसने त्यांना तिकीटही दिल्याची आठवणही मोदींनी करून दिली.

मोदींनी दिवंगत माजी सीडीएस प्रमुख जनरल विपिन रावत यांचाही काँग्रेसने कसा अपमान केला होता, अशा पक्षाला देशभक्तीची भाषा मान्य नाही, याची आठवण त्यांनी करून दिली. पंतप्रधान म्हणाले की, जेव्हा भाजप सीएएद्वारे मां भारतीवर विश्वास ठेवणाऱ्यांना भारतीय नागरिकत्व देते, तेव्हा काँग्रेसला सर्वात मोठी समस्या भेडसावते. पाकिस्तानातून आलेल्या गरीब आणि शीख कुटुंबांबद्दल बोलताना ते म्हणाले की, काँग्रेसने कितीही विरोध केला तरी या लोकांना मोदींची हमी असून त्यांना नागरिकत्व मिळेल, असा पुनरुच्चारदेखील पंतप्रधानांनी केला आहे.