नाशिक : राज्याच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर आली आहे. नाशिक लोकसभेसाठी स्वामी शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज भरल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांनी शिवसेनेच्या नावाने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.
लोकसभा निवडणूकीच्या पाचव्या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. नाशिक लोकसभेसाठी महायूतीकडून अद्याप कोणत्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. या जागेसाठी हेमंत गोडसेंचे नाव चर्चेत होते. दरम्यान, आता स्वामी शांतिगिरी महाराज नाशिकमधून महायूतीकडून लोकसभा लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
हे वाचलंत का? - ठाकरेंनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सुर्याकडे थोबाड करुन...; फडणवीसांचा टोला
याआधी शांतिगिरी महाराज हे नाशिकमध्ये अपक्ष अर्ज भरणार असल्याच्या असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र, आता त्यांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे स्वामी शांतिगिरी महाराज हे महायूतीचे नाशिकमधील उमेदवार असणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.