ठाकरेंनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सुर्याकडे थोबाड करुन...; फडणवीसांचा टोला
29-Apr-2024
Total Views |
सोलापूर : उद्धव ठाकरेंनी मोदींबद्दल बोलणं म्हणजे सुर्याकडे थोबाड करुन थुंकण्यासारखं आहे, असा खोचक टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे. उद्धव ठाकरेंनी भाजपवर केलेल्या टीकेला त्यांनी प्रत्युत्तर दिले. ते सोमवारी सोलापूर दौऱ्यावर असून त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "मोदीजींनी केलेला विकास हा संपूर्ण देश पाहतो आहे. पण उद्धवजी तुम्ही केलेलं एक विकासाचं काम दाखवा. त्यांनी जीवनात एकही विकासाचं काम केलेलं नाही. अडीच वर्ष मुख्यमंत्री राहिल्यानंतर ते एकही विकासाचं काम करु शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी मोदीजींबद्दल बोलणं म्हणजे सुर्याकडे थोबाड करुन थुंकण्यासारखं आहे."
ते पुढे म्हणाले की, "संजय राऊत वगैरे कोण आहेत ते मला माहिती नाही. पण एवढंच सांगतो की, ठाकरे म्हणजे महाराष्ट्र आहे या मानसिकतेतून त्यांनी बाहेर यायला हवं. आम्ही रामराम करण्याचा शिवसेनेला एवढा राग का आहे? भारतात रामराम केलं नाही तर पाकिस्तानात जाऊन करायचं का? आम्ही रामराम करणारच. त्यांनी जरी टिपू सुलतानचे नारे लावणं सुरु केलं असेल तरीदेखील आम्ही रामाचेच नारे लावू," असेही ते म्हणाले.