शेअर बाजार विश्लेषण: शेअर बाजार कोसळला ! सेन्सेक्स निफ्टीत ६०९.२८ अंशाने घसरत ७३७३०.१६ व निफ्टी ५० निर्देशांक ११२.६० अंशाने घसरत २२४५७.७५ पातळीवर

बँक निर्देशांकात मोठी घसरण

    26-Apr-2024
Total Views |

Stock Market
 
 
मोहित सोमण : आज इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात घसरण झाली आहे. सकाळप्रमाणेच अखेरच्या सत्रात भारतीय बाजारात घसरण कायम राहिली आहे.सर्वाधिक घसरण बँक निफ्टी निर्देशांकात झाल्याने आज बाजारात वाढ होऊ शकली नाही.अखेरीस सेन्सेक्स ६०९.२८ अंशाने घसरत ७३७३०.१६ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी ५० निर्देशांक ११२.६० अंशाने घसरण होत २२४५७.७५ पातळीवर स्थिरावला आहे. सेन्सेक्स निफ्टी बँक निर्देशांकात आज अनुक्रमे ४३५.८२ अंकाने व ३८४.२० अंशाने घसरण झाल्याने आज बाजारात घसरण झाली.
 
जागतिक पातळीवरील संकेत पाहता भारतीय संमिश्र कल असतील हे निश्चित होते परंतु भारतीय गुंतवणूकदारांनी सावधता बाळगल्याने तुलनेने आज बाजारात मोठी गुंतवणूक झालेली निर्दशनास आलेली नाही.युएस मधील जीडीपी आकडेवारीवर परदेशी गुंतवणूकदारांनी लक्ष केंद्रीत केल्यामुळे व मध्यपूर्वेतील तणाव शांत झाला असला तरी क्रूड तेलाच्या निर्देशांकात वाढ झाल्याने बाजारात आज नकारात्मक पवित्रा कायम होता.परिणामी भारतीय बाजारात घसरण झाली आहे.
 
बीएसईत (BSE) मध्ये लार्जकॅपमध्ये ०.४७ टक्क्यांनी घसरण झाली आहे. मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये निर्देशांकात अनुक्रमे ०.७९ व ०.२५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मिड कॅप व स्मॉलकॅपमध्ये होणारी वाढ आजही कायम राहिली आहे. एनएसईत (NSE) मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.७७ व ०.६१ टक्यांने वाढ झालेली आहे.
 
एनएसईतील क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये आज दबाव राहिला असला तरी संमिश्र प्रतिसाद समभागांना मिळाला आहे.बँक निफ्टी व्यतिरिक्त ऑटो,फायनांशियल सर्विसेस,मेटल,प्रायव्हेट बँक समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे. याखेरीज सर्वाधिक फायदा कनज्यूमर ड्युरेबल्स समभागात झाला असून फार्मा रिअल्टी, तेलगॅस, मिडिया,एफएमसीजी,आयटी समभागात गुंतवणूकदारांना आज फायदा झाला आहे.
 
बीएसईत आज ३९१३ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील २०१६ समभागातील मूल्यांकनात आज वाढ झाली आहे. तर २०१६ समभागात आज घसरण झाली आहे.त्यातील २५२ समभागाचे मूल्य ५२ आठवड्यातील सर्वाधिक असून १७६६ समभागातील मूल्यांकनात आज सर्वाधिक घसरण झाली आहे.एकूण ३६२ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले आहेत तर १८४ समभाग लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
एनएसईत आज एकूण २७१९ समभागांचे ट्रेडिंग झाले असताना त्यातील १३२० समभागातील मूल्यांकनात वाढ झाली आहे. १२७१ समभागात आज घसरण झाली आहे. त्यातील १३७ समभागातील मूल्यांकनात ५२ आठवड्यातील सर्वाधिक वाढ झाली आहे तर ८ समभागात ५२ आठवड्यातील सर्वाधिक घसरण झाली आहे. एकूण ११८ समभाग आज अप्पर सर्किटवर कायम राहिले असून ४० समभाग लक्ष लागून लोअर सर्किटवर कायम राहिले आहेत.
 
बीएसईतील कंपन्याचे एकूण बाजार भांडवल (Market Capitalisation) ४०४.४६ लाख कोटी राहिले असून एनएसईतील कंपन्याचे बाजार भांडवल ४००.६८ लाख कोटी रूपये राहिले आहे.
 
आज भारतीय रुपया डॉलरच्या तुलनेत तीन पैशाने घसरला असून प्रति डॉलर रुपयांची किंमत ८३.३४ रुपयांवर स्थिरावली होती. आज आंतरराष्ट्रीय स्तरावरील सोन्याच्या निर्देशांकात वाढ झाल्याने भारतातही सोने व चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. संध्याकाळपर्यंत युएस गोल्ड फ्युचर दरात ०.७२ टक्क्यांनी वाढ झाली आहे. भारतातील एमसीएक्स सोने निर्देशांकात ०.६८ टक्क्यांनी वाढ होत सोने निर्देशांक ७१६९९.०० पातळीवर पोहोचला आहे.चांदीच्या भावात प्रति किलो २००० रूपयांनी वाढ झालेली आहे. एमसीएक्सवर चांदीच्या निर्देशांकात ०.७४ टक्क्यांनी वाढ होत चांदी ८१२८० पातळीवर पोहोचली आहे.
 
आंतरराष्ट्रीय स्तरावरील मध्य पूर्वेकडील दबाव शांत झाला असला तरी अमेरिकेत जीडीपी आकडेवारी अपेक्षेनुसार न आल्यामुळे बाजारात नकारात्मक वातावरण होते. जीडीपी डेटा येणार म्हणून बाजारातील भाव सुरूवातीला स्थिर होते तरी तेलाच्या पुरवठा व मागणीत विसंगती असल्याने क्रूड तेलाच्या निर्देशांकात वाढ झाली आहे.WTI Future निर्देशांक आज ०.३७ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर Brent क्रूड निर्देशांकात संध्याकाळपर्यंत ०.३९ टक्क्यांनी वाढ झाली आहे.भारतातील एमसीएक्स (Multi Commodity Exchange) निर्देशांकात आज तब्बल १.३३ टक्क्यांपर्यंत वाढ होत प्रति बॅरेल तेलाची किंमत ७००३ रुपयेपर्यंत पोहोचली आहे. परिणामी क्रूड तेलाच्या भावात वाढ झाली आहे.
 
आज बाजारातील परदेशी गुंतवणूकदारांनी २८२३.३२ कोटींचे समभाग विकले आहेत तर देशांतर्गत गुंतवणूकदारांनी ६१६७.५६ कोटींचे समभाग विकत घेतले आहेत. अमेरिकन जीडीपी दरात निराशा आल्याने अमेरिकेत तिन्ही DOW, S & P ,NASDAQ बाजारात घसरण झाली असून युरोपातील तिन्ही FTSE 100, DAX CAC 40 या तिन्ही बाजार वधारले आहेत.आशियाई बाजारातील तिन्ही NIKKEI HANG SENG, SHANGHAI बाजारात वाढ झाली आहे.
 
आजच्या बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना ज्येष्ठ बाजार अभ्यासक अजित भिडे म्हणाले,'काल अमेरिकेचे जीडीपीचे आकडे आल्यावर डाओ जोन्सला धडकी भरली,तो १% खाली आला.तसेच आयएमएफने अमेरिकेच्या कर्जावरील केलेली शेरेबाजीमुळे शेअर बाजारातील या सर्व गोष्टींवरील परिणाम आपल्याला पहायला मिळाला. जागतिकीकरण याचे नांव, कारण आपल्या अनेक कंपनीचे बाॅडस विदेशात ट्रेड होत आहेत. त्यावर काल झालेला परिणाम आज लगेच आपल्याला पहायला मिळतो आहे पण आपला जीडीपी हा मजबूत आहे हल्लीच त्याचे रेटिंग झालेले आहे.आज बजाज फायनान्स च्या निकाला नंतर त्या मोठी घसरण पहायला मिळाली,कंसोलिडेशन ची प्रक्रिया सुरू असुन बाजार २२५०० च्या जवळ हळूहळू मजबुत होतोय का हे बघावे लागेल.'
 
बाजारातील स्थितीविषयी प्रतिक्रिया देताना जिओजित फायनांशियल सर्विसेसचे हेड ऑफ रिसर्च विनोद नायर म्हणाले,'यूएस कोर PCE किंमत निर्देशांकातील अनपेक्षित वाढ, जीडीपीच्या अंदाजापेक्षा कमकुवत वाढ आणि ट्रेझरी उत्पन्न वाढीमुळे बाजाराच्या भावनांवर परिणाम झाला. गुंतवणूकदार अमेरिकेत मंदीच्या संभाव्यतेबद्दल चिंतित आहेत.भारतीय बाजार त्याच्या आशियाई बाजारापेक्षा मागे पडला. FY25 कमाईसाठी घसरणीच्या पुनरुत्थानांच्या अपेक्षेला चालना देत, उच्च मूल्यांकन आणि निराशाजनक Q4 कमाईच्या चिंतेमुळे भारतीय बाजार आपल्या आशियाई आणि युरोपियन समवयस्कांच्या मागे पडला.'
 
भारतीय रुपयांच्या हालचालींवर प्रतिक्रिया देताना एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले 'रुपयाने ८३.८०- ८३.८६ च्या मर्यादेत व्यवहार केला,०.०४ रुपयांची घसरण अनुभवली. आजच्या संध्याकाळच्या PCE किंमत निर्देशांकाच्या प्रकाशनाच्या आसपासच्या अपेक्षेसह,रुपयाच्या कमकुवतपणाचा परिणाम डॉलरच्या बाजूच्या हालचालीमुळे झाला.याव्यतिरिक्त, किरकोळ पुलबॅक दिसून आला. भारतीय भांडवली बाजार ज्याने रुपया कमजोर ठेवला कारण FII च्या विक्रीमुळे रुपयावर किरकोळ दबाव वाढला आहे.'
 
एलकेपी सिक्युरिटीजचे व्हीपी रिसर्च एनालिस्ट जतीन त्रिवेदी म्हणाले,"सोन्याच्या किमती ४५० रुपयांनी वाढून ७१६५० वर पोहोचल्या, MCX मध्ये ७०००० वर सपोर्ट मिळाला, तर Comex Gold ला २३०० $ वर अल्पकालीन समर्थन मिळाले आणि $२३४८ वर व्यापार झाला.बाजाराचे लक्ष आता PCE किंमत निर्देशांक डेटा रिलीझवर आहे, जे आहे फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर निर्णयांसाठी एक महत्त्वपूर्ण सूचक जर डेटा जास्त काळासाठी उच्च दराचा अंदाज दर्शवित असेल तर ते सोन्याच्या किमतीवर दबाव आणू शकते,तर कमी चलनवाढीचा अंदाज सोन्याला आधार देऊ शकतो.'
 
बाजारातील परिस्थितीविषयी विश्लेषण करताना जेएम फायनांशियलचे सर्विसेसचे लिमिटेडचे ईबीजी कमोडिटी करन्सी रिसर्च प्रणव मेर म्हणाले, 'गेल्या काही व्यापार सत्रांमध्ये सोने अस्थिर झाले आहे,येणाऱ्या यूएस डेटा आणि डॉलरच्या हालचालींवर प्रतिक्रिया देत आहे.यू.एस.चा q1 जीडीपी क्रमांक अपेक्षेपेक्षा कमकुवत होता, तर काही इतर डेटा जसे की महिन्याच्या सुरुवातीला जाहीर करण्यात आलेले mfg./ सेवा PMI, गृहनिर्माण बाजार, टिकाऊ वस्तू इ. आर्थिक क्रियाकलाप मंदावण्याची चिन्हे दाखवत आहेत - केस लवकर वाढवण्याचे दर कपात,
 
परंतु वाढत्या महागाई आणि मजबूत कामगार बाजारामुळे या वर्षी सप्टेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये दर कपातीची अपेक्षा मागे ढकलली गेली आहे. पुढील आठवड्याच्या फेडरल रिझर्व्हच्या धोरण बैठकीपूर्वी मार्च महिन्यासाठी PCE/ कोर PCE वरील दिवसाच्या डेटावर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.तांत्रिकदृष्ट्या, ७०९००/ ७०६०० वर समर्थनासह बायस सकारात्मक दिसतो, तर वरच्या बाजूस ७१७१०/७२००० वर प्रतिकार असतो.'
 
बाजारातील घडामोडविषयी विश्लेषण करताना,असित मेहता इन्व्हेसमेंट इंटरमिजरीजचे एव्हिपी टेक्निकल डेरिएटिव एनालिस्ट हृषिकेश येडवे म्हणाले,'देशांतर्गत इक्विटी बेंचमार्कने शुक्रवारी त्यांचा पाच दिवसांचा विजयी सिलसिला थांबवला, कमकुवत जागतिक संकेतांमुळे तो थांबला आहे.निफ्टी मे मालिकेच्या पहिल्या दिवशी सकारात्मक नोटवर उघडला परंतु उच्च पातळीवर टिकू शकला नाही आणि दिवस नकारात्मक नोटवर बंद झाला.२२४२० वर ब्रॉडर मार्केटने बेंचमार्कला मागे टाकले आहे, तांत्रिकदृष्ट्या, इंडेक्सने २२६२० -२२६३० पर्यंत दैनंदिन स्तरावर गडद क्लाउड कव्हर केले आहे निर्देशांक २२६३० च्या वर टिकून राहिल्यास,निफ्टी २२००० २२६०० च्या श्रेणीत बळकट करण्याचा प्रयत्न करू शकतो,२२३०० आणि २२०००, तर प्रतिकार पातळी २२६३० आणि २२८०० आहेत.
 
निफ्टी बँक निर्देशांक एका अंतरासह उघडला परंतु उच्च स्तरावर टिकून राहण्यात अयशस्वी ठरला, दिवसाचा दिवस नकारात्मक नोटवर ४८२०१ वर स्थिरावला. गेल्या काही दिवसांत, निर्देशांकाने ४८५०० पातळी ओलांडली आहे परंतु त्याच्या वर बंद होऊ शकला नाही. जर बँक निफ्टी ४८५०० च्या वर बंद झाला, तर रॅली ४९०००-४९५००च्या पातळीवर वाढू शकते.बँक निफ्टीसाठी अल्पकालीन समर्थन पातळी ४७०००आणि ४६६०० वर दर्शविली आहे, तर प्रतिकार पातळी ४८५००आणि ४९५०० आहे"