शेअर बाजार अपडेट: बाजारात घसरण सेन्सेक्स २०१.७९ अंशाने घट होत ७४१२५.१२ व निफ्टी निर्देशांक ४३.१५ अंशाने घसरत २२५२७.२० पातळीवर

आयटी, मिडिया, फार्मा समभागात फायदा तर बँक निफ्टी घसरला

    26-Apr-2024
Total Views |

Stock Market
 
मुंबई: इक्विटी बेंचमार्क निर्देशांकात आज सकाळी घसरण झाली आहे. अमेरिकन बाजारातील झालेल्या घसरणीचे आशियाई बाजारात संमिश्र प्रतिसाद येत आहेत. अमेरिकेत फेडरल रिझर्व्ह व्याजदर कपात पुढे ढकलली गेल्यानंतर आता अमेरिकेत जीडीपीचे आकडे येणार असल्याने बाजारात गुंतवणूकदारांनी सावधतेचा पवित्रा घेतला होता.याशिवाय जागतिक पातळीवर क्रूड तेलाच्या किंमतीत वाढ झाल्याचा परिणाम गुंतवणूकीत जाणवू लागला आहे.
 
बीएसई निर्देशांकात आज १२५.६२ अंशाने घसरण होत ५४८६८.२४ पातळीवर झाली आहे. तर निफ्टी बँक निर्देशांकात आज ९८.५५ अंशाने घसरण होत ४८३९७.५० पातळीवर घट झाली आहे.
 
सकाळी सुरूवातीच्या सत्रात एस अँड पी सेन्सेक्स निर्देशांकात २०१.७९ अंशाने घट होत ७४१२५.१२ पातळीवर पोहोचला आहे. निफ्टी निर्देशांक ४३.१५ अंशाने घसरत २२५२७.२० पातळीवर पोहोचला आहे.बीएसई लार्जकॅप समभागात कुठलाही बदल झालेला नाही.बीएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५४ टक्क्यांनी व ०.२७ टक्क्यांनी वाढ झाली आहे.कालही मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये झालेल्या वाढीमुळे बाजार वधारले होते. मात्र आज लार्जकॅप समभागात (Shares) मध्ये गुंतवणूकदारांना नुकसान झालेले दिसत आहे. एनएसईत मिडकॅप व स्मॉलकॅपमध्ये अनुक्रमे ०.५२ व ०.४३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.
 
एनएसईत आज क्षेत्रीय निर्देशांकात (Sectoral Indices) मध्ये बँक,फायनांशियल सर्विसेस,पीएसयु बँक,प्रायव्हेट बँक,रियल्टी समभागात गुंतवणूकदारांना नुकसान झाले आहे. तर सर्वाधिक फायदा आयटी, मिडिया, फार्मा, कनज्यूमर ड्युरेबल्स, तेल गॅस समभागात झाला आहे.
 
बीएसईत टेक महिंद्रा, एचसीएलटेक, पॉवर ग्रीड, मारूती सुझुकी, टाटा मोटर्स, टाटा स्टील, एचडीएफसी बँक,एक्सिस बँक, आयटीसी, अल्ट्राटेक सिमेंट या समभागात वाढ झाली आहे.बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले, इंडसइंड बँक,एम अँड एम,एसबीआय,जेएसडब्लू स्टील,एसबीआय,लार्सन,भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, एनटीपीसी, कोटक महिंद्रा, इन्फोसिस, टायटन कंपनी या समभागात घसरण झाली आहे.
 
एनएसईत टेक महिंद्रा,डिवीज,बजाज ऑटो, विप्रो, एचसीएलटेक, ओएनजीसी, एचयुएल, हिरो मोटोकॉर्प,कोल इंडिया, टाटा मोटर्स, पॉवर ग्रीड, एचडीएफसी बँक, एक्सिस बँक, मारूती सुझुकी, सिप्ला, अल्ट्राटेक सिमेंट, आयटीसी, टाटा स्टील,एशियन पेंटस, टायटन कंपनी या समभागात वाढ झाली आहे. तर बजाज फायनान्स, बजाज फिनसर्व्ह, नेस्ले, एसबीआय, एम अँड एम, टाटा कनज्यूमर प्रोडक्ट, ग्रासिम, भारती एअरटेल, सनफार्मा, लार्सन, एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, अदानी एंटरप्राईज, ब्रिटानिया, इन्फोसिस,टायटन कंपनी या समभागात घसरण झाली आहे.