संदेशखळी प्रकरणात सीबीआयची मोठी कारवाई; ५ जणांवर दाखल केला गुन्हा

26 Apr 2024 17:29:48

Sandeshkhali
 
कोलकाता : पश्चिम बंगालमधील संदेशखळी येथे महिलांच्या लैंगिक छळाच्या प्रकरणी सीबीआयने कारवाई सुरू केली आहे. कोलकाता उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर, सीबीआयने जमीन बळकावणे आणि लैंगिक छळाच्या गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणांमध्ये सुरू असलेल्या तपासासंदर्भात पाच आरोपीसह इतर अज्ञातांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे.

पश्चिम बंगाल पोलिसांच्या नाकर्तेपणामुळे कोलकाता उच्च न्यायालयाने हस्तक्षेप करून संदेशखळी परिसरातील अनेक महिलांवर करण्यात आलेल्या गुन्ह्यांचा तपास सीबीआयकडे सोपवले होते. या गुन्ह्यांमध्ये बेकायदेशीर भूसंपादन आणि महिलांवरील हिंसाचार आणि लैंगिक छळाचा समावेश आहे.
 
हे वाचलंत का? -  संदेशखळीमध्ये सीबीआयची छापेमारी; 'हाफिझुल खान'च्या घरातून शस्त्रसाठा जप्त
एफआयआर नोंदवून सीबीआयने सखोल तपासाची सुरुवात केली आहे. यापूर्वी, कोलकाता उच्च न्यायालयाने संदेशखळी येथील लैंगिक छळ आणि जमीन बळकावण्याच्या प्रकरणांमध्ये न्यायालयाच्या देखरेखीखाली सीबीआय तपास करण्याचे निर्देश दिले होते. या प्रकरणी उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील संदेशखळी येथील महिला सत्ताधारी टीएमसी आणि त्याचा नेते शाहजहान शेख यांच्या विरोधात रस्त्यावर उतरल्या होत्या आणि शाहजहान आणि त्याच्या साथीदारांवर अत्याचार आणि त्यांची जमीन बळकावल्याचा आरोप केला होता.
तरीही पश्चिम बंगालच्या सरकारने शाहजहान आणि त्याच्या साथीदारांवर कोणतीही कारवाई केली नव्हती. पश्चिम बंगालमध्ये विरोधी पक्ष असलेल्या भाजपने आंदोलन केल्यानंतर, दबावापुढे झुकत ममता सरकारने शाहजहान शेखला अटक केली. त्यानंतर कोलकाता उच्च न्यायालयाने शाहजहान शेखला पोलिस कोठडीत न पाठवता, केंद्रीय तपास यंत्रणांच्या ताब्यात दिले.
 
 
Powered By Sangraha 9.0