मोदींनी केला जॉर्जिया मेलोनींना फोन; 'हे' आहे कारण

    26-Apr-2024
Total Views |
 meloni
 
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवार, दि. २५ एप्रिल २०२४ इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी फोनवरून चर्चा केली. जूनमध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेसाठी आमंत्रित केल्याबद्दल त्यांचे आभार मानले. पंतप्रधान मोदींनी समाज माध्यमावर ही माहिती दिली. एक्सवर वरील पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, "मी पंतप्रधान मेलोनी आणि इटलीच्या लोकांना इटलीच्या स्वातंत्र्य दिनाच्या ७९ व्या वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. जूनमध्ये होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेसाठी मला आमंत्रित केल्याबद्दल मी त्यांचे आभार मानले असल्याचेही त्यांनी सांगितले. भारतात झालेल्या जी-२० निर्णय मध्ये पुढे नेण्याची चर्चा केली."
 
 
चर्चेदरम्यान, दोन्ही नेत्यांनी धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या त्यांच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. यासोबतच दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर आपापल्या विचारांची देवाणघेवाण केली. पंतप्रधान मोदींनी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली.
 
जून 2024 मध्ये इटलीच्या पुगलिया येथे होणाऱ्या जी-७ शिखर परिषदेला आमंत्रित केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान मेलोनी यांचे आभार मानले. इटलीच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जी-७ शिखर परिषदेत भारताच्या जी-२० अध्यक्षपदाच्या, विशेषत: ग्लोबल साउथला पाठिंबा देण्याचे महत्त्वाचे परिणाम पुढे नेण्याबाबत दोन्ही नेत्यांनी चर्चा केली.